दहशतवाद्याची आई म्हणाली, बेटा सरेंडर कर; एन्काऊंटरच्या काही मिनिटे आधीचा धक्कादायक Live व्हिडिओ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Tral Encounter Video: पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले, तर यापूर्वी शोपियामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
श्रीनगर: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात सघन शोध मोहीम तीव्र केली आहे. या ऑपरेशनदरम्यान गेल्या काही दिवसांत 6 दहशतवादी मारले गेले आहेत. गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख आसिफ अहमद शेख (गुलाम मोहम्मद यांचा मुलगा, रा. मुंगहामा त्राल), आमिर नजीर वाणी (नजीर यांचा मुलगा, रा. खासीपोरा त्राल) आणि यावर अहमद भट (नजीर अहमद यांचा मुलगा, रा. लारो जागीर त्राल) अशी आहे. हे तिघेही जैश-ए-मोहम्मद (JEM) या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.
आमिर नजीर वानीचा व्हिडिओ समोर
सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी आमिर नजीर वाणी याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ कॉलवर आपल्या आईशी बोलताना दिसत आहे. संभाषणादरम्यान त्याची आई त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगत आहे. ती म्हणते, बेटा सरेंडर कर. मात्र त्यानंतरही त्याने आत्मसमर्पण केले नाही आणि सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तो मारला गेला.
advertisement
आई म्हणाली...
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दहशतवादी आमिर नजीर वानी चकमकीपूर्वी आपल्या आईशी बोलताना दिसत आहे. आमिर नजीर वाणीची आई त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगत आहे. पण आमिर म्हणतो, फौजेला पुढे येऊ दे, मग बघतो. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत आमिर मारला गेला.
#terrorist killed in #Tral #Encounter was seen talking to his mother before the encounter #BREAKING #Encounter #terrorists #Nadar #Tral #pulwama #SouthKashmir #IndianArmy #Pakistan #PulwamaAttack #Pulwama
Aamir Nazir Wani Aamir's mother is telling him to surrender but Aamir… https://t.co/a58CwlyrNw pic.twitter.com/zrbilW8BZ2
— Indian Observer (@ag_Journalist) May 15, 2025
advertisement
नादेर त्राल भागात चकमक
पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील अवंतीपुराच्या नादेर त्राल भागात दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची अचूक माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी करून शोध मोहीम सुरू केली. त्यांनी सांगितले की, शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली.
शोपियामध्ये लष्करचे तीन दहशतवादी ठार
अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्युत्तरादाखल तीन दहशतवादी मारले गेले. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी शोपिया जिल्ह्यातील केल्लर भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी मारले गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात शोध मोहीम अजूनही सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 15, 2025 8:36 PM IST
मराठी बातम्या/देश/
दहशतवाद्याची आई म्हणाली, बेटा सरेंडर कर; एन्काऊंटरच्या काही मिनिटे आधीचा धक्कादायक Live व्हिडिओ