Kolhapur News: कोल्हापूरातील 'या' शिक्षकांचं काही खरं नाही; दोषी आढळले की होणार थेट कारवाई!

Last Updated:

Kolhapur News: जिल्हा परिषेदच्या कार्यरत असलेल्या 356 शिक्षकांची वैद्यकीय प्रमाणपत्रे तपासली जाणार आहेत. दिव्यांग आणि गंभीर आजार हे कारण देऊन...

Kolhapur News
Kolhapur News
कोल्हापूर : जिल्हा परिषेदच्या कार्यरत असलेल्या 356 शिक्षकांची वैद्यकीय प्रमाणपत्रे तपासली जाणार आहेत. दिव्यांग आणि गंभीर आजार हे कारण देऊन 'संवर्ग एक'चा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राती सत्यता तापसली जाणार आहेत. कारण बोगस प्रमाणपत्र साद करून शिक्षिकांकडून लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने कठोर निर्णय घेत तपासणीचा रेटा सुरू केला आहे.
अशी आहे तालुकानिहाय शिक्षकांची यादी
आजरा-20, भुदरगड-23, चंदगड-12, गडहिंग्लज-25, गगनबावडा-7, हातकलंगले-40, कागल-24, करवीर-61, पन्हाळा-24, राधानगरी-39, शाहूवाडी-20 आणि शिरोळ 61 अशी तालुकानिहास लाभ घेतलेल्या शिक्षकांची संख्या आहे. राज्य शासनाच्या ऑनलाईन बदली धोरणानुसार विशेष संवर्ग भाग एकनुसार 1 ते 12 अशा विविध कारणांमध्ये शिक्षकांना बदली करून घेता येते. त्यापैकी 12 शारीरिक आजारांपैकी व्याधीग्रस्त आणि दिव्यांग शिक्षक या विशेष तरतुदीचा लाभ घेतात.
advertisement
बदली प्रक्रियेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह
मात्र, बनावट वैद्यकिय प्रमाणात सादर करून अनेक शिक्षकांनी याचा लाभ घेतला आहे, अशा तक्रारी जिल्हा परिषदेला मिळालेल्या होत्या. यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी 356 शिक्षकांच्या वैद्यकिय प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीचा निर्णय घेतला आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी
यासाठी कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे याचा सखोल तपास करून अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. या अहवालानंतर संबंधित शिक्षक लाभासाठी पात्र आहेत की नाहीत हे कळणार आहे. जर यात अपात्र शिक्षकांवर शासकीय नियमांनुसार कडक कारवाई केली जाणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Kolhapur News: कोल्हापूरातील 'या' शिक्षकांचं काही खरं नाही; दोषी आढळले की होणार थेट कारवाई!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement