'BIGG BOSS 19 ' मधून बाहेर येण्यासाठी अवेजने भरले 2 कोटी? अखेर समोर आलं सत्य
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
BIGG BOSS 19 Awez Darbar : अवेज दारबार ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यापासून सतत प्रतिक्रिया देत आहे. त्याच्या इव्हिक्शन संदर्भात अलीकडे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' या छोट्या पडद्यावरील वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रमातून अवेज दरबार बाहेर पडला आहे. त्याच्या शोमधून बाहेर पडण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की दरबार कुटुंबाने अवेजला घरातून बाहेर काढण्यासाठी म्हणजेच इव्हिक्शनसाठी २ कोटी रुपये भरले आहेत. या चर्चांवर अखेर अवेजने मौन सोडलं आहे. इंडिया टुडेसोबत बोलताना अवेज म्हणाला,"मी हे ऐकून खूप अपसेट झालो आहे. मला हे कसं समजावून सांगावं, हेच समजत नाही. जर मला घराबाहेर पडण्यासाठी 2 कोटी रुपये द्यावे लागले असते, तर मी 50 लाखांसाठी घरात शिरलोच का असतो? म्हणजेच एवढा पैसा वाया घालवण्याचा काय अर्थ आहे. याचा तरी एकदा विचार करा".
अवेज पुढे म्हणाला की,"जर मी काही चूक केली असेल तर मी पुन्हा घरात जाईन आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करीन. मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. जर मी काही चूकच केलेली नसेल, तर घराबाहेर आल्यावर मी का घाबरू? जेव्हा गौहरने मला रिअॅलिटी चेक दिला, तेव्हाही घरातले लोक माझ्याबद्दल बोलत होते. लोकांना वाटत होतं की मी त्यांना उत्तर द्यावं. आता मला गेम खेळायचा आहे. माझ्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांना माझ्या इव्हिक्शनमुळे खूपच धक्का बसला होता".
advertisement
लवकरच करणार आहेत निकाह
अवेज दरबारच्या आधी त्याची गर्लफ्रेंड घरातून बेघर झाली होती. त्यानंतर अवेजलाही कमी वोट्समुळे घराबाहेर जावे लागले. ‘बिग बॉस 19’मध्ये अवेजच्या गेमबाबत बोलायचं झालं, तर तो सुरुवातीपासूनच एक कमजोर खेळाडू म्हणून ओळखला जात होता. सलमान खानसह घरातले सदस्यही त्याच्या गेम प्लानला नेहमीच सर्वात कमजोर कंटेस्टंट म्हणून मानत होते. विशेष म्हणजे, अवेज आणि नगमाने शोमध्ये हे ठरवले होते की ते लवकरच निकाह करणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 5:01 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
'BIGG BOSS 19 ' मधून बाहेर येण्यासाठी अवेजने भरले 2 कोटी? अखेर समोर आलं सत्य