Car: 5.80 लाख किमी कार चालवून पठ्याने वाचवले 18 लाख रुपये, कंपनीलाही बसला शॉक, नेमकं केलं कसं?

Last Updated:

ज्यांच्याकडे ईलेक्ट्रिक वाहनं आहे त्यांचा पेट्रोलचा खर्च चांगलाच कमी झाला आहे. अशातच एका तरुणाने ईलेक्ट्रिक कार वापरून तब्बल 18 लाखांचा खर्च वाचवला आहे.  

News18
News18
वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी आता ईलेक्ट्रिक वाहनं हा बेस्ट पर्याय ठरत आहे. मार्केटमध्ये आता एकापेक्षा एक अशा ईलेक्ट्रिक वाहनं उपलब्ध आहे. पूर्वी कमी रेंजची ईलेक्ट्रिक वाहनं उपलब्ध होती. पण आता जास्तीत जास्त रेंज देणारी वाहनं आता मार्केटमध्ये आली आहे. ज्यांच्याकडे ईलेक्ट्रिक वाहनं आहे त्यांचा पेट्रोलचा खर्च चांगलाच कमी झाला आहे. अशातच एका तरुणाने ईलेक्ट्रिक कार वापरून तब्बल 18 लाखांचा खर्च वाचवला आहे.
ईलेक्ट्रिक वाहनं किती चांगली आहे, याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. दक्षिण कोरियामध्ये राहणाऱ्या ली यंग-ह्यूम या व्यक्तीने आपल्या ईलेक्ट्रिक कारमुळे मोठी बचत केली आहे. ली यंग-ह्यूम कडे Hyundai Ioniq 5 नावाची ईलेक्ट्रिक कार आहे. त्याने ही कार थोडी थोडकी नाहीतर तब्बल 5.80 लाख किमी चालवली. फक्त २ वर्षे ९ महिन्यांत त्यानेही या कारने प्रवास केला. सेल्समन असल्यामुळे त्याने रोजचा प्रवास याच कारने केला होता. २ वर्षात इतकी कार चालवणे ही मोठी बाब आहे. दिवसाला तो 586 किमी प्रवास करायचा. प्रवासात तो  Ioniq 5 ही मूळ बॅटरी पॅक वापरत होता. आणि मालकाला इलेक्ट्रिक पॉवरट्रेन किंवा कारमध्ये कोणतीही समस्या आढळली नाही. तो  फास्ट चार्जिंग स्टेशनवरच आपली कार चार्ज करायचा.
advertisement
कंपनीने दिली बॅटरी बदलण्याची ऑफर 
ली यंग-ह्यूमने जेव्हा सोशल मीडियावर आपल्या कारबद्दल माहिती दिली तेव्हा Hyundai कंपनीलाही आश्चर्याचा धक्का बसला. हुंडई-किया रिसर्च इन्स्टिट्यूटने कारच्या बॅटरीची तपासणी करण्यासाठी ली यंग-ह्यूमशी संपर्क साधला. त्याला बॅटरी बदलून घेण्यास सांगितलं. ली यांना बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर मोफत बदलण्याची ऑफर देण्यात आली. प्रयोगशाळेत तांत्रिक चाचणीसाठी वापरले जाणारे बॅटरी पॅक आणि मोटर मिळविण्यासाठी हे केले गेलं. आयोनिक ५ चे ओडोमीटर रीडिंग सुमारे ५.८० लाख किमी होतं. अशा चाचण्या सहसा टॅक्सींवर केल्या जातात, कारण त्यांच्याकडे ओडोमीटर रीडिंग खूप जास्त असतं.
advertisement
८७.७ टक्के बॅटरी हेल्थ
गंमत म्हणजे, 5. 80 लाख किमी चालवून सुद्धा बॅटरीवर कोणताही परिणाम झाला नाही. बॅटरीची हेल्थ अजूनही 87.7 टक्के चांगली होती. मुळात इतका वापर कुणी केला तर बॅटरी डाऊन होण्याची शक्यता अधिक असते. पण इथं हा प्रकार घडला नाही.  Hyundai Ioniq 5 ने या ली यांचे खूप पैसे वाचवण्यास मदत केली आहे. इतक्या प्रवासासाठी जर त्याने पेट्रोल कार वापरली असती तर  १८.२० लाख रुपये वाचवले आहेत. ६.६० लाख किमीच्या ओडोमीटर रीडिंगवर एकूण संचयी चार्जिंग खर्च सुमारे ३०.३६ लाख रुपये असतो. त्या तुलनेत, टर्बोचार्ज्ड १.६-लिटर Tucson ला तेवढे अंतर चालवण्यासाठी सुमारे ४८.५६ लाख रुपये खर्च येईल. याचा अर्थ इंधन खर्चात सुमारे १८.२० लाख रुपयांची बचत झाली आहे.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Car: 5.80 लाख किमी कार चालवून पठ्याने वाचवले 18 लाख रुपये, कंपनीलाही बसला शॉक, नेमकं केलं कसं?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement