30 वर्षानंतर शनिदेव देणार कर्माचे फळं! 'या' राशींच्या लोकांना नवीन नोकरीसह व्यवसायात यश मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : नवग्रहांमध्ये शनी हा सर्वाधिक प्रभावशाली ग्रह मानला जातो. शनीला कर्मफलदाता म्हणून ओळखले जाते, कारण तो व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. इतर ग्रहांच्या तुलनेत शनीचा वेग मंद असतो.
मुंबई : नवग्रहांमध्ये शनी हा सर्वाधिक प्रभावशाली ग्रह मानला जातो. शनीला कर्मफलदाता म्हणून ओळखले जाते, कारण तो व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. इतर ग्रहांच्या तुलनेत शनीचा वेग मंद असतो. त्यामुळे तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि पुन्हा त्याच राशीत परतण्यासाठी जवळपास ३० वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनी आणि गुरु यांच्या विशेष संयोगामुळे त्रिदशंसा योगाची निर्मिती होत आहे. या योगाचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार असला तरी काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
त्रिदशंसा योग म्हणजे काय? वैदिक ज्योतिषानुसार, जेव्हा गुरु आणि शनी यांच्यामध्ये १०८ अंशांचे अंतर तयार होते, तेव्हा त्रिदशंसा योग बनतो. १०८ हा अंक अत्यंत पवित्र मानला जातो आणि या योगामुळे व्यक्तीला समाजात मान-सन्मान, संपत्ती आणि स्थैर्य प्राप्त होते. सध्या शनी मीन राशीत वक्री आहे, तर गुरु मिथुन राशीत स्थित आहे. या विशेष संयोजनामुळे काही राशींच्या लोकांना प्रगतीची संधी मिळेल.
advertisement
वृषभ राशी - वृषभ राशीच्या लोकांसाठी हा कालखंड अतिशय शुभ आहे. बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल. आकस्मिक आर्थिक लाभाची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थिती मजबूत बनेल. कुटुंबातील मतभेद कमी होतील आणि परस्पर संबंध सुधारतील. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल ठरेल. एकाग्रता वाढून अभ्यासात चांगले यश मिळेल. व्यवसायिकांना गुंतवणुकीतून नफा होईल. प्रेम जीवनात जुने तणाव दूर होऊन सौहार्द वाढेल. समाजात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
मिथुन राशी - गुरु आणि शनीच्या त्रिदशंसा योगामुळे मिथुन राशीच्या लोकांना आनंददायी काळ अनुभवता येईल. कुटुंबातील तणाव कमी होऊन घरगुती वातावरण सुखकर होईल. तुमच्या मेहनतीला यश मिळेल आणि जीवनात नवी ऊर्जा येईल. व्यवसायात नफा होईल आणि नवीन संधी मिळतील. बराच काळ थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील. अध्यात्माकडे ओढ निर्माण होईल आणि मानसिक समाधान मिळेल. नातेसंबंधांमध्ये उबदारपणा वाढेल.
advertisement
मकर राशी - मकर राशीच्या व्यक्तींनाही त्रिदशंसा योगाचे सकारात्मक परिणाम मिळतील. आरोग्य सुधारेल आणि जुन्या तक्रारी दूर होतील. मानसिक शांती व आत्मविश्वास वाढेल. व्यापाऱ्यांना मोठ्या संधी मिळतील आणि व्यवसायाचा विस्तार होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रवासातूनही फायदेशीर परिणाम दिसतील. कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. संतानाबरोबरचे मतभेद दूर होतील आणि त्यांच्या प्रगतीशी संबंधित आनंदाची बातमी मिळेल.
advertisement
दरम्यान, गुरु-शनीचा त्रिदशंसा योग ही अत्यंत प्रभावी खगोलीय घटना असून याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. मात्र वृषभ, मिथुन आणि मकर राशीच्या लोकांना या काळात विशेष लाभ, आर्थिक प्रगती, आरोग्यसुधारणा आणि सामाजिक सन्मान मिळण्याची शक्यता आहे. योग्य प्रयत्न, संयम आणि सकारात्मक दृष्टीकोनामुळे या राशींचे भाग्य उजळून निघेल.