Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनी मेष राशीत गजलक्ष्मी योग! या 3 राशींना अनपेक्षित धनलाभ, पैसाच-पैसा लागणार हाती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Gajlaxmi Rajyog Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार, सुख-सुविधांचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह ठराविक कालावधीनंतर राशीपरिवर्तन करतो. सध्या शुक्र मीन राशीत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र 25 एप्रिल रोजी सकाळी 12:07 वाजता मेष राशीत प्रवेश करेल. तिथे तो 19 मे पर्यंत राहणार आहे.
देवतांचा गुरू मानला जाणारा गुरू ग्रह (बृहस्पति) मेष राशीत आधीपासूनच आहे. अशा स्थितीत शुक्र आणि गुरूचा संयोग आहे. त्याचबरोबर शुक्राचा चौथ्या घरात प्रवेश झाल्यामुळे गजलक्ष्मी नावाचा राजयोग तयार होत आहे. हा योग 1 मे 2024 पर्यंत राहील, कारण बृहस्पति नंतर आपली राशी बदलून वृषभ राशीत प्रवेश करेल. मेष राशीमध्ये गजलक्ष्मी योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींना मिळणार विशेष लाभ...
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement