Mulank 9 Yearly Horoscope 2026: दिनांक 9, 18, 27 या तारखांचा जन्म असणाऱ्यांना नवीन वर्ष कसं? आर्थिक बाबी, करिअर, प्रेमजीवन
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mulank 9 Yearly Horoscope 2026: आता आपल्याला माहीतच झालं असेल, नवे वर्ष 2026 हे ग्रहांचा राजा सूर्याचा अंक आहे. 2026 ची एकूण बेरीज 1 येते. अंक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळाला ग्रहांचा सेनापती आणि पृथ्वीपुत्र म्हटले जाते. राजाला आपला सेनापती प्रिय असतो. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 9 येतो. मूलांक 9 आणि 1 यांचा एकमेकांशी खूप चांगला संबंध मानला जातो, त्यामुळे पाहिलं तर नवीन वर्ष मूलांक 9 च्या लोकांसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. मूलांक 9 चे वार्षिक अंक ज्योतिष सविस्तर जाणून घेऊया.
अंक ज्योतिषानुसार मूलांक 9 चं नवीन वर्ष मंगलदायक होणार आहे. 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांपैकी ज्यांचा जन्म 9 तारखेला झाला आहे, त्यांना खूप जास्त फायदा होण्याची अपेक्षा आहे. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, त्या लोकांसाठी नवीन वर्ष खूपच चांगलं असणार आहे. नवीन वर्षात तुमच्या कामाचा विस्तार होऊ शकतो. बिझनेसमध्ये चांगला नफा आणि मोठी डील करण्याची संधी मिळू शकते. तसेच जे लोक नवीन वर्षात स्वतःचं काही काम किंवा बिझनेस सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठीही नवीन वर्ष खूप लकी ठरेल. तुम्हाला सकारात्मक फळं पाहायला मिळतील. नवीन सुरुवातीसाठी नवीन वर्ष खूपच शानदार आहे.
advertisement
मूलांक 9 च्या लोकांना नवीन वर्षात करिअरमध्ये यश मिळेल. जे काम कराल, त्यात अनुकूल परिणाम मिळतील. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि तुम्ही पैसे कमावण्यात यशस्वी व्हाल. 2026 मूलांक 9 च्या लोकांसाठी सुवर्ण संधी घेऊन येईल. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा नवीन वर्ष खूप चांगलं राहील. तुम्ही जी मेहनत कराल, त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्यासाठी जी वाट निवडली आहे, त्यावर पुढे जात राहा, यश नक्की मिळेल.
advertisement
नवीन वर्षात जे लोक नोकरी बदलू इच्छितात किंवा जे बेरोजगार आहेत, त्या लोकांना चांगली बातमी मिळेल. तुम्हाला नवीन नोकरी मिळणार आहे. या वर्षात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. बँक बॅलन्स वाढेल. ज्या कामाला करायचं आहे, त्यावर बेधडक पुढे जा, मेहनत कराल तर काम यशस्वी होईल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठं यश मिळेल आणि त्यांचं नाव सुद्धा होईल.
advertisement
advertisement
तसंच जे लोक लव्ह लाइफमध्ये आहेत, त्यांना थोडं सावध राहण्याची गरज आहे, कारण मंगळाचा स्वभाव उग्र असतो. प्रेम संबंधांमध्ये तुम्हाला शांततेने काम घ्यावं लागेल, आपल्या पार्टनरसोबत वादविवाद टाळा. प्रेमाने बोला आणि जेव्हा वादाची परिस्थिती येईल तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करा. संयम ठेवा, नाहीतर लव्ह लाइफमध्ये संकट निर्माण होऊ शकतं. कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका.
advertisement
2026 मध्ये मूलांक 9 च्या लोकांना आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. खाण्यापिण्यातील हलगर्जीपणा तुमच्यासाठी अडचण उभी करू शकतो. जंक फूड खाल्लं नाही तर चांगलं होईल. आपल्या मनातील नकारात्मकता संपवण्यासाठी योग, ध्यान, प्राणायाम, व्यायाम, पूजा, पाठ असं जे काही शक्य असेल ते करा, ज्यामुळे तुम्हाला शांतता मिळेल आणि तुम्ही गेल्या वर्षीच्या कडू आठवणी विसरून पुढे जाऊ शकाल. नवीन वर्षात तुम्ही सूर्य नमस्कार घालाय सुरुवात करा, हनुमानाची पूजा करा आणि मंगळवारचा उपवास धरा. तुमचं जीवन सुखमय होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










