Astrology: संघर्ष-संकटे खूप काळ सोसली! या राशींचे आता पालटणार नशीब, यशाच्या दिशेनं वाटचाल
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल मंगळवारचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा मंगळवारचं दैनिक राशीभविष्य 22 ऑक्टोबर 2024..
मेष (Aries) : समाजातील तुमची प्रतिष्ठा जपा. इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करा. स्वतःविषयी अभिमान बाळगा. तुम्ही इतरांसाठी देखील प्रेरणादायी ठराल. प्रत्येक कामाकडे सकारात्मक दृष्टिने पहा. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य मजबूत होईल. यशाच्या दिशेनं वाटचाल करताना जीवनातील विविध पैलूंमध्ये संतुलन निर्माण करा आणि पुढे पावलं टाका. तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यावर परिणाम करतील. त्यामुळे विचारपूर्वक पुढे जा आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
Lucky Color : Maroon
Lucky Number : 9
Lucky Color : Maroon
Lucky Number : 9
advertisement
वृषभ (Taurus) : आरोग्य सामान्य राहील. पण नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. ध्यानधारणा आणि योगामुळे तुमचं मन आणि शरीर ताजेतवानं होईल. सामाजिक जीवनात काहीतरी विशेष गोष्ट मिळेल. हा अनुभव तुमच्यासाठी आनंददायी असेल. आसपासच्या लोकांशी संवाद साधण्याकरिता वेळ काढा. यामुळे परस्परांमधील गैरसमज दूर होतील आणि तुमचं नातं मजबूत होईल. दिवस उत्साह वाढवणारा आणि सकारात्मक असेल.
Lucky Color : White
Lucky Number : 13
Lucky Color : White
Lucky Number : 13
advertisement
मिथुन (Gemini) : जुन्या मित्राला भेटणं एक सुखद अनुभव असेल. तुमची ऊर्जापातळी चांगली असेल. थकवा टाळण्यासाठी थोडावेळ आराम करा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती देखील मिळेल आणि तुम्ही ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकाल. दिवस संमिश्र आहे. सकारात्मकता आणि तुमच्या खास शैलीच्या जोरावर वाटचाल केली तर यश मिळू शकेल. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे ऊर्जापातळी कायम राहील. सर्जनशीलतेचा वापर करा आणि नवीन कल्पनांचा वापर करण्यास संकोच करू नका. ध्येय साध्य करण्यासाठी दिवस चांगला आहे. पुढे जा आणि तुमची स्वप्न सत्यात उतरवा.
Lucky Color : Red
Lucky Number : 11
Lucky Color : Red
Lucky Number : 11
advertisement
कर्क (Cancer) : दिवस तुम्हाला नवीन सुरुवातीचे संकेत देईल. मनात सकारात्मक बदल होतील. प्रियजनांकडून प्रेम आणि आपुलकी मिळेल. दीर्घकाळापासून एखादी समस्या सतावत असेल तर ती सुटू शकते. ऑफिसमध्ये नवीन आव्हानांना सामोरं जावं लागेल. पण बुद्धिमत्ता आणि समर्पणाच्या जोरावर तुम्ही त्यावर मात करा. आर्थिक बाबतीत सावध रहा. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आरोग्य चांगले राहील. नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहारावर भर द्या.
Lucky Color : Orange
Lucky Number : 8
Lucky Color : Orange
Lucky Number : 8
advertisement
सिंह (Leo) : जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. सर्जनशीलतेचा पूरेपूर वापर करू शकाल. त्यामुळे आसपासच्या लोकांना देखील प्रेरणा मिळेल. नवीन प्रकल्पावर काम करण्यासाठी दिवस चांगला आहे. तुम्हाला मेहनतीचं फळ मिळेल. सामाजिक प्रगतीसाठी त्याचा वापर करा. इतर व्यक्तींशी कनेक्ट रहा. आरोग्य चांगले राहील. नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद वाटेल. तुम्ही भावनिकदृष्ट्या सक्षम व्हाल. जुना मित्र भेटल्याने आठवणींना उजाळा मिळेल.
Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 1
Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 1
advertisement
कन्या (Virgo) : सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला तर नवीन माहिती आणि संधी मिळू शकते. छंद किंवा आवड जोपासण्यासाठी दिवस चांगला आहे. देवावर विश्वास ठेवा आणि ध्येयाकडे वाटचाल करत रहा. घरात शांतता आणि सौहार्द राहण्यासाठी संवाद साधताना काळजी घ्या. एखाद्या खास व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. पण धीर धरा आणि हुशारीने वागा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचारांनी वाटचाल करा. मेहनत आणि विचारांच्या जोरावर यश मिळेल.
Lucky Color : Dark Green
Lucky Number : 10
Lucky Color : Dark Green
Lucky Number : 10
advertisement
तूळ (Libra) : सुसंवाद आणि समतोल गरजेचा आहे. विचारांमध्ये स्पष्टता असेल. आसपासच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकाल. नवीन संबंध जोडण्यासाठी दिवस चांगला आहे. सर्जनशीलता चांगली असल्याने नवीन प्रकल्प किंवा एखादा छंद सुरू करू शकता. आरोग्याची काळजी घ्या. योगा किंवा ध्यानधारणा केल्याने नवीन ऊर्जा मिळेल. मानसिक संतुलन देखील चांगले राहील. दिवस सकारात्मक आणि नवीन शक्यता दर्शवणारा आहे. विचार आणि भावना व्यक्त करा. इतरांचे म्हणणे ऐका.
Lucky Color : Yellow
Lucky Number : 7
Lucky Color : Yellow
Lucky Number : 7
advertisement
वृश्चिक (Scorpio) : तुमचा फोकस आणि ऊर्जा नवीन दिशेने जाईल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. प्रियजनांशी तुमचे नाते सखोल होऊ शकते. तसेच नात्यात समजूतदारपणा असेल. नवीन प्रकल्प आणि संकल्पनेवर काम करण्यासाठी दिवस चांगला आहे. संपर्कातून नवीन संधी मिळू शकते. अस्वस्थता किंवा तणाव दूर करण्यासाठी ध्यानधारणा किंवा योगा करा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. यामुळे मानसिक आरोग्य देखील सुधारेल. अनुभव तुमच्या भविष्याचा पाया रचत आहेत हे लक्षात ठेवा.
Lucky Color : Pink
Lucky Number : 2
Lucky Color : Pink
Lucky Number : 2
advertisement
धनू (Sagittarius) : दिवस सकारात्मक आणि ऊर्जादायी असेल. करिअरमध्ये नवीन प्रकल्प मिळू शकतो. त्यामुळे सतर्क रहा. योगा किंवा ध्यानधारणा केल्याने ऊर्जा संतुलित राहील. सामाजिक जीवनात उत्साह असेल. नवीन मित्र जोडू शकता. जवळचा मित्र किंवा कुटुंबातील सदस्यासोबत संवाद साधल्याने आराम वाटेल. यातून तुम्हाला नवीन दृष्टीकोन मिळेल. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. लहान यश देखील साजरे करा. दिवस वैयक्तिक विकास आणि आत्मपरिक्षणाचा आहे.
Lucky Color : Green
Lucky Number : 6
Lucky Color : Green
Lucky Number : 6
advertisement
मकर (Capricorn) : संतुलन आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी दिवस चांगला आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पना आणि योजनांना मान्यता मिळेल. सहकाऱ्यांशी संवाद साधताना काळजी घ्या, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. वैयक्तिक जीवनात नवीन पैलू समोर येतील. त्यासाठी नाते संबंधांकडे नव्याने पहा. आर्थिक दृष्टिकोनातून नवीन गुंतवणूक करण्यासाठी योजना आखू शकता. पण गुंतवणुकीपूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आरोग्य सामान्य असेल. तणाव कमी करण्यासाठी आराम करा.
Lucky Color : Blue
Lucky Number : 5
Lucky Color : Blue
Lucky Number : 5
advertisement
कुंभ (Aquarius) : दिवस विशेष संधी घेऊन येईल. सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी दिवस चांगला असेल. तुम्ही तुमच्या कल्पना व्यक्त करू शकाल. त्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. जुनी चिंता संपल्याने मानसिक शांती मिळेल. थोडा व्यायाम आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक, शारीरिक बळ मिळेल. दिनचर्येत नवीन सवयी समाविष्ट करा. नवीन शक्यतांसाठी खुले रहा. सर्जनशीलता व्यक्त करण्यात संकोच करू नका.
Lucky Color : Black
Lucky Number : 3
Lucky Color : Black
Lucky Number : 3
advertisement
मीन (Pisces) : अध्यात्म आणि सर्जनशीलतेसाठी दिवस चांगला आहे. आंतरिक आवाज ऐकल्यास महत्त्वाचे निर्णय घेता येतील. विचार व्यक्त करण्यासाठी उत्सुक असाल. सुसंवाद आणि शांततेसाठी दिवस चांगला आहे. संवेदनशील असाल. आसपासच्या लोकांच्या भावनेची काळजी घ्या. जुन्या मित्राला भेटू शकता. यामुळे आठवणींना उजाळा मिळेल. ऑफिसमध्ये मेहनतीचे फळ मिळू शकते, पण त्यासाठी संयम ठेवा. वैयक्तिक जीवनात एखाद्या गोष्टीबाबत तणाव असेल तर त्यासाठी संवाद साधण्याची हीच योग्य वेळ आहे.
Lucky Color : Navy Blue
Lucky Number : 12
Lucky Color : Navy Blue
Lucky Number : 12