Astrology: विनायक चतुर्थीला अद्भुत योगायोग; या 4 राशींच्या व्यक्तींना होणार लाभ, बाप्पा पावणार

Last Updated:
Vinayak Chaturthi Horoscope: हिंदू धर्मात चतुर्थी ही तिथी भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. गणेश ही बुद्धीची देवता आहे. कोणत्याही शुभकार्याच्या वेळी सर्वप्रथम श्री गणेशाला वंदन केलं जातं, त्याची पूजा केली जाते. चतुर्थीचं व्रत केल्यास आणि श्री गणेशाचं मनोभावे विधिवत पूजन केल्यास विघ्नहर्ता गणेश सारी दुःखं-संकटं दूर करतात, अशी श्रद्धा आहे.
1/7
दर महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला विनायक चतुर्थी, तर कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. आज 11 मे रोजी वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातली चतुर्थी अर्थात विनायक चतुर्थी आहे. या दिवशी खूप चांगले योग तयार होत आहेत. हे योग शुभ असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे. हे योग काही राशींच्या व्यक्तींच्या धनसंपदेत वाढ करतील, मान-सन्मान मिळवून देतील. त्या राशी कोणत्या, हे जाणून घेऊ या. 

advertisement
2/7
वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातली चतुर्थी तिथी 11 मे रोजी दुपारी दोन वाजून 50 मिनिटांनी सुरू होत असून, 12 मे रोजी दुपारी 2 वाजून 3 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीचा विचार करता विनायक चतुर्थी 11 मे रोजी, म्हणजेच शनिवारी असेल. त्याच दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत असेल.

3/7
या वर्षी विनायक चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. त्यात सुकर्मा योग, धृती योग आणि मृगशीर्ष नक्षत्र यांचा समावेश आहे. हे सगळे योग खूप शुभ मानले गेले आहेत. ते मनोवांछित फळं देतात. या शुभ योगांमुळे 11 मे रोजीची विनायक चतुर्थी कोणत्या चार राशींसाठी खूप शुभ ठरेल, हे जाणून घेऊ या.

4/7
कन्या रास : बॉसचा सन्मान करा आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐका. तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. हा या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस आहे. व्यापार करणाऱ्यांची उत्तम कमाई होईल. घरात वेळ व्यतीत करावा. शांती मिळेल.

5/7
मीन : व्यापारी वर्गाने ग्राहकांशी चांगलं वर्तन ठेवल्यास खूपच लाभ मिळेल. ग्राहक वाढतील. उत्पन्न वाढेल. करिअरमध्ये प्रगती होईल. नवी गाडी, घर खरेदी करू शकता. हा दिवस आनंदात व्यतीत होईल.

6/7
मिथुन : या राशीच्या व्यक्तींनी विचारपूर्वक काम केल्यास यश मिळेल. या राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस चांगला राहील. सर्वांशी विनम्रतेने बोलावं. लोक आदर करतील. जीवनात सुखसोयी वाढतील. व्यापारी वर्गाला आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या सहयोगाने मोठा लाभ मिळवता येईल.

7/7
धनू : या राशीच्या व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य मिळेल. कामं सहज होतील. बिझनेसमध्ये पार्टनरशिपमधून लाभ होईल. लव्ह लाइफ चांगलं असेल. धनलाभ होईल. आरोग्यही चांगलं राहील. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement