60 हजारांत आलीये हिरोची नवी बाईक! इंजिनमध्ये बदल, मायलेजही वाढेल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
OBD-2B (On-Board Diagnostics 2B) हा एक नवीन सरकारी नियम आहे. जो बाईक्सना अधिक कडक उत्सर्जन नियमांचे पालन करणे आवश्यक करतो. OBD-2B उत्सर्जन मानकांनुसार इंजिनमधून होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत करेल.
मुंबई : हिरो मोटोकॉर्पने आता त्यांची लोकप्रिय एंट्री लेव्हल बाईक HF100 ला OBD-2B नियमांनुसार अपडेट केले आहे. केवळ हिरोच नाही तर इतर कंपन्यांनीही हळूहळू त्यांच्या बाइक्स OBD-2B नियमांनुसार अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. हिरोच्या या बाईकला अपडेट करून तिची किंमतही वाढवण्यात आली आहे. बाईकची किंमत 1,100 रुपयांनी वाढवण्यात आली आहे आणि तिची एक्स-शोरूम किंमत 60,118 रुपये झाली आहे. ही दैनंदिन वापरासाठी चांगली बाईक आहे. त्यात काही खास दिसेल का ते पाहूया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement