Jawa करणार आता रॉयल एनफिल्डचं मार्केट जाम, आणतेय दमदार बाइक, लूक एक नंबर!
- Published by:sachin Salve
Last Updated:
आता पुन्हा एकदा क्लासिक लिजेंड्स आपली लोकप्रिया येजदी अडव्हेंचर (Yezdi Adventure) चं नवीन अपडेटेट व्हर्जन लाँच करणार आहे.
नवदच्या दशकामध्ये भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी जावा Jawa कंपनीच्या दुचाकींना कुणीही विसरू शकत नाही. आता Jawa ने नव्या रुपात आणि नव्या ढगामध्ये Jawa नव्याने मार्केटमध्ये लाँच केली. आता पुन्हा एकदा क्लासिक लिजेंड्स आपली लोकप्रिया येजदी अडव्हेंचर (Yezdi Adventure) चं नवीन अपडेटेट व्हर्जन लाँच करणार आहे. ही बाइक ऑफ रोड वाहनं प्रेमी ग्राहकांना समोर ठेवून लाँच केली जात आहे.
advertisement
advertisement
Yezdi Adventure च्या नवीन मॉडेलचं डिझाइनमध्ये अनेक बदल केले जाणार आहे. या बाइकचा लूक बदलला जाईल, ज्यामुळे या सेगमेंटमध्ये ही बाइक वेगळी ओळखली जाईल. तसंच बाइकमध्ये पॉवरफुल इंजिन दिलं जाणार आहे. यामध्ये 334cc चं लिक्विड-कूल्ड इंजिन असेल जे 29.6 हॉर्सपावर आणि 29.8Nm टॉर्क जनरेट करेल. पण या बाइकचा परफॉर्मेंस हा आधीच्या बाइक सारखाच असेल.
advertisement
advertisement