'तिच्याशी लग्न करणं माझीच चूक...', तिसरी गर्लफ्रेंड मिळताच पहिल्या बायकोबद्दल हे काय म्हणाला आमिर खान?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Aamir Khan personal life : आमिर खानने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या चुकांबद्दल खुलासा केला आहे. त्याने खूप घाईघाईने रीना दत्ताशी लग्न केले, जी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती!
मुंबई: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर' या चित्रपटाच्या चर्चांमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. याच दरम्यान, आमिर खानने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. सुपरस्टारने सांगितले आहे की, त्याने खूप घाईघाईने रीना दत्ताशी लग्न केले, जी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती!
advertisement
advertisement
आपल्या लग्नाबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, "मी एक साधी गोष्ट सांगतोय, रीना आणि मी खूप लवकर लग्न केले होते. मी २१ वर्षांचा होतो, तर ती १८-१९ वर्षांची होती. खरे तर, २१ वर्षांचा झाल्यावर तुम्हाला एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. त्यात ३० दिवस जातात. तर, १४ मार्चला मी २१ वर्षांचा झालो. त्यानंतर एक महिन्याचा नोटीस दिली. त्यामुळे, कायदेशीररित्या माझ्यासाठी लग्न करण्याचा पहिला दिवस होता, तो म्हणजे १४ एप्रिल. पण शनिवार-रविवार येत होता. त्यामुळे, रीना आणि माझ्यासाठी कायदेशीररित्या लग्न शक्य असलेला पहिला दिवस १८ एप्रिल होता."
advertisement
सुपरस्टारने पुढे सांगितले, "आम्ही १८ एप्रिलला लग्न केले आणि आम्ही एकमेकांना त्याआधी फक्त चार महिनेच ओळखत होतो, आणि त्या चार महिन्यांतही आम्ही एकमेकांसोबत खूप कमी वेळ घालवला होता. आमच्या मनात एकमेकांसाठी खूप प्रेम होते, खूप स्नेह होता, म्हणूनच आम्ही लग्नही केले. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मला असे वाटते की, लग्नासारखे महत्त्वाचे पाऊल विचारपूर्वक उचलले पाहिजे. त्यावेळी तारुण्याच्या जोशात तुम्हाला खूप गोष्टी समजत नाहीत. पण नंतर तुम्हाला त्याची जाणीव होते."
advertisement
आमिर खान म्हणाला, "रीनासोबत माझे आयुष्य खूप चांगले गेले आहे. त्यामुळे, यात तुम्ही असा अर्थ काढू नका की रीना चुकीची होती. माझा तो अर्थ अजिबात नाही. रीना एक खूप चांगली व्यक्ती आहे आणि आम्ही दोघेही एका अर्थाने एकत्र मोठे झालो, कारण आम्ही लग्न केले, तेव्हा आम्ही इतके लहान होतो. रीना आणि मी एकमेकांचा खूप आदर करतो आणि आमच्या मनात एकमेकांसाठी खूप प्रेम आहे. पण मला असे वाटते की, कोणीही इतक्या लवकर, इतक्या कमी वयात, इतक्या घाईघाईत एवढा मोठा निर्णय घेऊ नये."
advertisement
शेवटी आमिर म्हणाला, "आज जेव्हा मी पाहतो, तेव्हा मला असे वाटते की कदाचित मी ते केले नसते, पण जर मी ते केले नसते, तर आज मी तुमच्यासमोर बसलो नसतो. म्हणूनच त्याला मी चूकही मानू शकत नाही. मी त्याला चूक मानू शकत नाही, कारण त्यातून मला दोन सर्वात मोठी गिफ्ट्स मिळाली आहेत, जुनैद आणि आयरा. ती मला त्या लग्नातून मिळाली आहेत."
advertisement
"रीनासोबत मला १६ वर्षे घालवायला मिळाली. या सगळ्या गोष्टी चुका नाहीत. या तर चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे कठीण आहे. एका अर्थाने मी त्याला चूक म्हणेन की, चार महिन्यांत तुम्ही लग्न करत आहात हे ठरवून टाकले. एवढा मोठा निर्णय तुम्ही इतक्या लवकर घेतला. अशा अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत. पण मला असे वाटते की, कुठेतरी त्या योग्यही ठरल्या आहेत. माणूस चुका करतो, त्यातूनच शिकतो आणि तुम्ही जी चूक करता, मग तुमचे आयुष्य तेच बनते." आमिरच्या या प्रांजळ कबुलीने चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील आणखी एक पैलू समोर आला आहे.