स्वतःला आरशात पाहून ढसाढसा रडायची अभिनेत्री, शेवटी केला निश्चय! आज TV ची सर्वांत ग्लॅमरस हिरोईन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Avika Gor Birthday : आज ३० जून रोजी अविका गौरचा वाढदिवस आहे. या खास दिवशी आपण अविकाच्या एका अविश्वसनीय प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत
मुंबई: छोट्या पडद्यावरच्या 'बालिका वधू' मालिकेतील 'आनंदी'च्या भूमिकेने घराघरात पोहोचलेली आणि आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली अभिनेत्री म्हणजे अविका गौर. आज ३० जून रोजी तिचा वाढदिवस आहे. या खास दिवशी आपण अविकाच्या एका अविश्वसनीय प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत, तिच्या 'वेट लॉस' म्हणजेच वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी!
advertisement
एक काळ असा होता, जेव्हा अविकाने आरशात स्वतःला पाहिलं आणि तिला अश्रू आवरता आले नाहीत. त्यानंतर तिने स्वतःमध्ये इतकं जबरदस्त परिवर्तन केलं की, ते पाहून लोक अक्षरशः थक्क झाले. अविका गौरने काही वर्षांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, तिच्या वाढलेल्या वजनापासून ते ते कमी करण्याच्या प्रवासाची कहाणी उघड केली होती.
advertisement
अविकाने तिच्या त्या लांबलचक पोस्टमध्ये सांगितलं होतं, "मला आजही आठवतंय. गेल्या वर्षी जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिलं, तेव्हा मी रडले होते. मी जशी दिसत होते, ते मला अजिबात आवडत नव्हतं. जाडसर बाहू, जाडसर पाय आणि सुटलेलं पोट. जर हे सगळं थायरॉईड किंवा पीसीओडीमुळे असतं, तर ठीक होतं, कारण ते माझ्या नियंत्रणाबाहेर होतं. पण हे सगळं माझ्या जास्त खाण्यामुळे आणि काहीही खाण्यामुळे होतं. मी अजिबात वर्कआउट करत नव्हते."
advertisement
advertisement