कचरापेटीतलं अन्न खाल्लं, तर कधी उपाशी पोटी झोपली, आज इंडस्ट्रीत राज्य करतेय 'लाफ्टर क्वीन'
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Comedian Struggle Story : कधी कचरापेटीतलं अन्न खाऊन तर कधी उपाशी राहून या लॉफ्टर क्वीनने दिवस काढले आहेत. एकेकाळी तिला दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण होतं.
advertisement
advertisement
advertisement
भारती सिंहने आपल्या करिअरची सुरुवात ‘द ग्रेट इंडियन लॉफ्टर चॅलेंज’ या शोमधून केली होती. तिच्या कॉमेडीने प्रेक्षकांना भरपूर हसवलं. या शोमध्ये तिने साकारलेलं ‘लल्ली’ हे पात्र चांगलच गाजलं. त्यानंतर ती ‘कॉमेडी सर्कस’ या शोमध्ये झळकली. हा शोही खूपच लोकप्रिय झाला होता. याच शोमध्ये तिची ओळख हर्ष लिम्बाचियाशी झाली. भारती जिथे परफॉर्मर होती, तिथे हर्ष या शोचा रायटर होता.
advertisement
advertisement
advertisement