उर्मिला कोठारे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट, दोनजणांना चिरडणाऱ्या ड्रायव्हरला अटक

Last Updated:
Urmila Kothare Car Accident: काल म्हणजेच २८ डिसेंबरला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकरच्या कारचा भीषण अपघात झाला.
1/7
काल म्हणजेच २८ डिसेंबरला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकरच्या कारचा भीषण अपघात झाला. उर्मिला कामावरून घरी परत असताना हा अपघात झाला. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली.

advertisement
2/7
या अपघातात मेट्रो स्थानकाजवळील एक मजूर गंभीर जखमी झाला, तर एकाचा मृत्यू झाला. अभिनेत्री उर्मिला कोठारे देखील गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

3/7
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली.

4/7
ज्या मजूरांना उर्मिलाच्या कारने उडवलं ते दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते. उर्मिलाही या अपघातात जखमी झाली. पण एका मजूराचा यात मृत्यू झाला.

5/7
मुंबईतील समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवाय MH-47-AG-7657 नंबर असलेली ‘हुंदाई’ कार जप्त केली आहे.

6/7
अपघाताच्या वेळी चालक दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही? याचा तपास करण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले आहेत. या भीषण अपघातामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा कसून तपास करत आहेत.

7/7
उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेतून तब्बल 12 वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची ती पत्नी असून निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement