प्रेमात कन्फ्युजन अन् अपूर्ण लव्हस्टोरी ; OTT वरील 'या' 5 भन्नाट रोमँटिक फिल्म्स पाहाच
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Zee5 Romactic Films : ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर असंख्य रोमँटिक चित्रपट आहेत. पण ZEE5 वरील या 5 खास रोमँटिक फिल्म्स तुम्ही नक्की पाहायला हव्या. या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना हात घालण्यात आलेला आहे.
Zee5 वरील पाच चित्रपटांमध्ये प्रेमातील गुंतागुंत, सामाजिक बंधनं आणि संघर्ष यांचं सुरेख चित्रण करण्यात आलं आहे. जाणून घ्या या रोमँटिक फिल्म्सबद्दल...
advertisement
लव, सितारा : शोभिता धुलिपाला, राजीव सिद्धार्थ अभिनीत 'लव, सितारा' या चित्रपटात मल्याळी मुलगी तारा आणि पंजाबी शेफ अर्जुन यांची अनोखी प्रेमकहाणी दाखवली आहे. तारा आणि अर्जुनचं लग्न ठरतं आणि अर्जुन लग्नाआधी तिच्या गावी तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला जातो. मात्र त्याला तिथे जुळवून घेणं सोपं जात नाही. हा एक कौटुंबिक ड्रामा असून, प्रेम आणि सांस्कृतिक संघर्ष यांचं मिश्रण आहे.
advertisement
लव्ह हॉस्टेल : विक्रांत मैसी, सान्या मल्होत्रा, बॉबी देओल अभिनीत 'लव्ह हॉस्टेल' हा चित्रपट आहे. बॉबी देओल याने या चित्रपटात क्रूर खलनायक 'डागर'ची भूमिका साकारली आहे. चित्रपटात ज्योती (सान्या) आणि अशू (विक्रांत) प्रेमविवाह करतात. पण त्यांच्या जातिव्यवस्थेविरुद्ध जाण्यामुळे पंचायत त्यांना संपवण्याचा आदेश देते. डागर त्यांच्यामागे लागतो आणि शेवटी दोघांनाही मारतो. हा चित्रपट थ्रिलर, क्राईम आणि रोमांच मिश्रण आहे.
advertisement
तडका : नाना पाटेकर, श्रिया सरन, तापसी पन्नू, अली फजल यांची मुख्य भूमिका असलेली एक मिडल एज लव्ह स्टोरी असलेली ही रोमँटिक कॉमेडी फिल्म आहे. नाना पाटेकर यांनी तुकाराम नावाचा फूडी आर्किओलॉजिस्ट साकारला आहे. एका चुकलेल्या कॉलमुळे त्याची ओळख माधुरीशी होते आणि तिथून प्रेम फुलतं. दुसरीकडे निकोल (तापसी) आणि सिद्धार्थ (अली) यांचं प्रेमही थोड्या वयाच्या अंतरामुळे चॅलेंज होतं.
advertisement
द लास्ट कॉफी : द लास्ट कॉफीमध्ये अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत आहे. रेहान आणि इरम या जोडप्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. जे घटस्फोटाच्या टप्प्यावर आहेत. तरी ते शेवटचं एकदा भेटतात आणि त्या भेटीत जुन्या आठवणी, गैरसमज आणि भावना उफाळून येतात. काश्मीरच्या बर्फाच्छादित पार्श्वभूमीवर शूट झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावतो. काही प्रेक्षकांनी याची तुलना पाकिस्तानी ड्रामांशी केली आहे.
advertisement
बमफाड : बमफाडमध्ये आदित्य रॉय कपूर, शालिनी पांडे, विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट इलाहाबादच्या गल्लीबोळात घडणारी एक जबरदस्त प्रेमकहाणी आहे. नसीर (आदित्य) आणि नीलम (शालिनी) यांची भेट एक चुकलेल्या प्रसंगातून होते, पण त्याचं रूपांतर खोल प्रेमात होतं. हे प्रेम त्यांना संघर्षांच्या वाटेवर नेतं. जाती-पातीच्या विळख्यातून त्यांना बाहेर पडायचं असतं.