प्रसिद्ध गायिकेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, 3800 मुलांसाठी बनली देवदूत
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Singer : बॉलिवूडची लोकप्रिय गायिका 3800 मुलांसाठी देवदूत बनली आहे. या मुलांच्या हॉर्ट सर्जरीसाठी गायिका मदत करणार आहे. अभिनेत्रीचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात आलं आहे.
भारतात कला ही फक्त मनोरंजनाचं साधन नाही, तर समाजसेवा आणि लोकांना एकत्र आणण्याचं माध्यम मानली जाते. आपल्या देशात असे अनेक कलाकार झाले आहेत ज्यांनी आपल्या कलेने लोकांची मनं जिंकलीच नाहीत, तर समाजात बदल घडवून एक उदाहरणही निर्माण केलं. भारतामध्ये कलेचं खरं उद्दिष्ट फक्त नाव किंवा प्रसिद्धी मिळवणं नाही, तर आपल्या कलेच्या माध्यमातून मानवतेसाठी काहीतरी चांगलं करणं आहे. नुकतीच बॉलिवूडची एक प्रसिद्ध गायिका 3800 मुलांसाठी देवदूत बनली आहे.
advertisement
advertisement
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल सध्या चर्चेत आहे. 30 मार्च 1992 रोजी मध्यप्रदेशातील इंदूर येथे जन्मलेल्या पलकने लहानपणापासूनच शिकले आहे की संगीत हे फक्त ऐकण्यासाठी नसतं, तर ते एखाद्याचं जीवन वाचवण्याची ताकदही असतं. पलकने वयाच्या 6 व्या वर्षी रस्त्यावर गाणं गाऊन कारगिलच्या शहीद आणि गरीब मुलांसाठी निधी गोळा केला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


