Dharmendra: 'एक-एक करून सगळे मला सोडून गेले', धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दुःखात बुडाली दिग्गज अभिनेत्री, फुटला अश्रूंचा बांध
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra Passed Away: ६० आणि ७० च्या दशकात धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्या अतिशय भावुक झाल्या आहेत.
मुंबई: बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. ६० आणि ७० च्या दशकात त्यांच्यासोबत अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनीही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या आणि धर्मेंद्र यांच्यातील मैत्रीचे नाते पडद्यामागेही तितकेच जिव्हाळ्याचे होते.
advertisement
advertisement
advertisement
आशा पारेख आणि धर्मेंद्र यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, ज्यांची आजही आठवण काढली जाते. त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायची. या जोडीने 'आये दिन बहार के' (१९६६), 'शिकार' (१९६८), 'मेरा गांव मेरा देश' (१९७१) आणि 'समाधी' (१९७२) यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांचे चित्रपट रोमाँस, ड्रामा आणि संगीताचा जबरदस्त संगम होता.
advertisement
advertisement
advertisement
ऋषिकेश मुखर्जींच्या 'सत्यकाम'मधील धर्मेंद्र यांचा अभिनय त्यांना खूप आवडल्याचेही त्यांनी सांगितले. 'चुपके चुपके' मध्येही त्यांच्यासोबत काम करण्याची त्यांची इच्छा होती, पण काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. आशा पारेख यांच्या या आठवणीतून धर्मेंद्र यांच्या मोठेपणाची आणि त्यांच्या निखळ मैत्रीची प्रचिती येते.


