Prajakta Mali : "तुमच्या राजकीय हेतूसाठी..." भर पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी भडकली, म्हणाली, "अर्थ कळू नये इतकं..."
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prajakta Mali Press Conference: प्राजक्ता माळीनेही हे प्रकरण गांभीर्याने घेत, तिचा रोष व्यक्त केला आहे. इतकंच नाही, तर तिने सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रारही केली आहे.
बीडमधील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापलं आहे. या प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या प्रकरणी आज बीडमध्ये मूकमोर्चाही काढण्यात आला. या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असून त्याला मंत्री धनंजय मुंडे संरक्षण देत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.
advertisement
advertisement
advertisement
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना लक्ष्य करतानाच प्राजक्ता माळीसह रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांचीही नावं घेतली. अवैधरीत्या जमिनी बळकावून त्या पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला. या प्रकरणात नाव आल्यामुळे यावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन तिची भूमिका मांडली आहे.
advertisement
धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत आणि राजकारणाबाबत सुरेश धस यांना विचारले असता, “धनुभाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले? काय ते सांस्कृतिक कार्यक्रम..! रश्मिका मंदाना, लै कंबर हलवते ती सपना चौधरी, अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे, येथून शिक्षण घ्यावे आणि देशभरात जाऊन त्याचा प्रचार प्रसार करावा,” अशी उपहासात्मक टीका सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर केली.
advertisement
पत्रकार परिषद सुरू होण्याआधी प्राजक्ता रडलेली होती, तिचे डोळे पाणावलेले आणि सुजलेले दिसत होते. प्राजक्ता म्हणाली, “मी या आधीही हजारो नेते आणि मान्यवरांसोबत फोटो काढले आहे. मग त्यांच्यासोबत नाव जोडणार का? हे खूपच कुस्थित आहे. कोणतेही पुरुष कलाकार कधीच परळीला येत नाहीत का? कोणतीही महिला कोणत्याही पुरुषाच्या, राजकारण्याच्या आधाराशिवाय मोठी होऊ शकत नाही का."
advertisement
advertisement
advertisement
"‘प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे, येथून शिक्षण घ्यावे आणि देशभरात जाऊन त्याचा प्रचार प्रसार करावा,’ या वक्तव्यांचा अर्थ कळू नये इतकी महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. कोणीही काहीही बोलावं, त्यावर सॉरी म्हणावं हे इतकंच नाही आहे. यावर कठोर नियम असायला हवेत. तुम्ही जे सांगताय, त्यात जर तथ्य नसेल, तर यावर कठोर कारवाई केली जावी अशी माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे.”


