Health Tips : मटण खाल्ल्याने खरंच कॅन्सर होतो का? पाहा काय आहे सत्य आणि तज्ज्ञांचे मत..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Red Meat Side Effects : नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांची आपल्याकडे कमतरता नाही. बरीच लोक आवडते म्हणून मांस खातात तर काही लोक शरीराच्या पोषण गरजा पूर्ण करण्यासाठी नॉनव्हेजचा आपल्या आहारात समावेश करतात. मात्र कोणत्या प्रकारचे मांस आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते नुकसानदायक हे माहित असणं आवश्यक आहे. लाल मांसाविषयी असे बोलले जाते की, त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. आज आपण यामागचे सत्य जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
किती लाल मांस खाणं सुरक्षित? : ब्रिटिश हेल्थ सर्व्हिसने त्यांच्या अभ्यासाच्या आधारे सांगितले की, लाल मांसाचे जास्त सेवन केल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. विज्ञान देखील हे सत्य मानते की, लाल मांस प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. लाल मांस मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास त्यातून होणारा धोका कमी असतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्रक्रिया केलेले मांस म्हणजे काय? : प्रक्रिया केलेले मांस मीठ आणि इतर संरक्षकांचा वापर करून धुरात शिजवले जाते आणि बरेच दिवस ठेवले जाते. त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात, जे पॅकेटमध्ये बंद करतात आणि दीर्घकाळ टिकवले जातात. भारत, नेपाळ किंवा इतर काही देश वगळता जवळपास सर्वच देशांमध्ये प्रक्रिया केलेले मांस दीर्घकाळ टिकणाऱ्या पॅकेटमध्ये विकले जाते. परंतु प्रक्रिया केलेले मांस हे लाल मांसापेक्षा वाईट आहे.