Health Tips : पालकापेक्षा जास्त पॉवरफुल आहे ही 'चायनीज भाजी', हाडं आणि हृदय बनवते मजबूत
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
ऋतूनुसार आपण आपल्या आहारात बदल करतो. पण काही पदार्थ असे असतात, जे प्रत्येक ऋतूमध्ये आपल्यासाठी फायदेशीर असतात. अशीच एक भाजी आहे पालक, जी खूप पौष्टिक असते. बरेच लोक नियमित पालकाचे सेवन करतात. पण तुम्हाला माहितीये का पालकापेक्षाही पॉवरफुल आणि जास्त गुणकारी अशी एक भाजी आहे, जी चायनीज आहे. आज आम्ही तुम्हाला या भाजीचे जबरदस्त फायदे सांगणार आहोत.
पालकापेक्षा चायनीज कोबी जास्त फायदेशीर मानली जाते. कारण, त्यात पालकापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आणि ए असते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि हृदयाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी ही भाजी महत्त्वाची भूमिका बजावते. लखनऊच्या रीजेंसी हॉस्पिटलच्या आहारतज्ञ रितू त्रिवेदी यांनी या भाजीचे सर्व फायदे तपशीलवार सांगितले आहेत.
advertisement
नावाप्रमाणे, ही भाजी सर्वप्रथम चीनमध्ये तयार करण्यात आली होती, त्यानंतर ती भारतासह जगभरात पिकवली जाऊ लागली. चायनीज कोबीला नापा कोबी, सेलेरी कोबी, बोक चोय आणि पोक चोई अशी अनेक नावं आहेत. चायनीज कोबीमध्ये साध्या कोबीपेक्षा जास्त व्हिटॅमिन ए असते. चायनीज कोबी कच्ची खाल्ल्यास चवदार, कुरकुरीत आणि गोड लागते. शिजवल्यावर ती मऊ होते. ही भाजी वाफवून, ग्रील करून आणि उकळूनही खाता येते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement