उपाशीपोटी सकाळी फळे खावीत का? जाणून घ्या आहार तज्ज्ञांचा सल्ला
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वर्षभर मिळणाऱ्या फळांचे नियमित सेवन केल्यामुळे वेगवेगळी जीवनसत्त्वे शरीरास मिळत असतात.
सकाळी उठल्यानंतर बऱ्याच जणांना भूक लागते आणि मग अशावेळी फळे, दूध, चहा किंवा नाश्त्याचे पदार्थ यापैकी काहीही आपल्याकडून खाल्ले जाते. तर बरेच जण सकाळी उठल्यावर मुद्दाम तब्येतीसाठी म्हणून पण फळांचे सेवन करत असतात. पण उपाशी पोटी फळे खाणे खरंच शारीरिक दृष्ट्या चांगले असते का? हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरच्या</a> आहार तज्ज्ञ स्नेहल पै यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
वर्षभरात वेगवेगळ्या ऋतुमानानुसार बाजारात वेगवेगळी फळे विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. या आणि वर्षभर मिळणाऱ्या फळांचे नियमित सेवन केल्यामुळे वेगवेगळी जीवनसत्त्वे शरीरास मिळत असतात. त्यामुळे फळे ही शरीरासाठी फळे लाभदायकच ठरत असतात. तर सकाळी उपाशीपोटी अशी फळे खाणे हे देखील आरोग्यदायीच असते, असे आहार तज्ज्ञ स्नेहल पै यांनी सांगितलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
सकाळी उपाशी पोटी फळे खाणे कधीही चांगलेच मात्र सकाळच्या नाष्ट्या ऐवजी फक्तच फळे खाणे अयोग्य आहे. कारण सकाळच्या वेळी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते आणि ती फक्त फळांच्या सेवनाने पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच दिवसभर थकवा जाणवून सारखी भूक लागू शकते. अशावेळी फळांसोबत उकडलेली अंडी किंवा मोड आलेली कडधान्य खावीत, असेही पै यांनी सांगितलं.
advertisement
रात्रीच्या जेवणानंतर बऱ्याच जणांना फळे खाण्याची सवय असते. मात्र रात्री झोपण्याआधी, जेवणासोबत किंवा जेवणाला नंतर लगेच फळे खाऊ नयेत. ज्यांना अॅसिडिटीचा खूप त्रास होत असतो त्यांनी देखील सकाळी उपाशीपोटी फळे खाऊ नयेत. सकाळी ऐवजी अशा लोकांनी दोन जेवणांच्यामध्ये फळे खावीत. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनीही गोड फळे सकाळी उपाशीपोटी खाणे टाळावे, असे स्नेहल पै सांगतात.
advertisement


