ट्रकची दुचाकीला धडक; 12 KM फरफटत नेली गाडी, दोघांचा मृत्यू, जळगावातील घटनेचे भयावह PHOTOS

Last Updated:
इम्तियाज अहमद, जळगाव : राज्यात दररोज अपघाताच्या काही ना काही घटना समोर येत असतात. मात्र, काही अपघात इतके भीषण असतात की त्याबद्दल ऐकूनही अंगावर काटा येतो.
1/6
सध्या जळगाव जिल्ह्यातून अपघाताची एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे

advertisement
2/6
वरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने पुढे असलेल्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की यामुळे यात दुचाकीवर असलेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

3/6
मात्र, यानंतर ट्रक चालकाने जे काही केलं ते आणखीच धक्कादायक होतं. अपघातानंतर सुद्धा ट्रक चालकाने गाडी थांबवली नाही आणि ही दुचाकी तब्बल 12 किलोमीटर फरफटत नेली.

4/6
अखेर नशिराबाद टोल नाक्यावर पोलिसांच्या नाकाबंदीत ट्रक पकडण्यात आली आणि चालकास अटक करण्यात आली आहे. या वेळचे व्हिडिओ समोर आले आहेत. ठार झालेले दोघे जामनेर तालुक्यातील होते.

5/6
जितू राठोड आणि प्रकाश उखा तंवर (दोन्ही रा. माधव तांडा, ता.जामनेर) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

6/6
घटनेची माहिती मिळताच टोल नाक्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली. यावेळी नागरिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये दुचाकी ट्रकच्या खाली अडकलेली दिसत आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement