22,00,000,00 घराच्या मालकाला कोणी घर देतं का घर? धनुभाऊंच्या महाराष्ट्रातील घरांची यादीच समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुंबईत राहण्यासाठी घर नाही म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची महाराष्ट्रात पुणे, मुंबई, परळीत घरे आहेत.
माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंना सरकारी बंगला काही सोडवेना अशीचं परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय. कारण कृषीमंत्रिपदावरून पाय उतार होऊन पाच महिने उलटून गेले आहेत. पण अद्यापही त्यांनी आपला सरकारी बंगला काही सोडला नाही. मुंबईत राहण्यासाठी घर नसल्याचं कारण त्यांनी पुढे केलं आहे. पण आता एक नवी माहिती समोर आली आहे.
advertisement
मुंबईत घर नसल्याचं कारण देत सातपुडा हा सरकारी बंगला सोडण्यास नकार दिलाय. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांचे महाराष्ट्रात पाच घरे असून या घरांची किंमत २२ कोटींच्या आसपास आहे. पुणे, परळी, मुंबई या ठिकाणी त्यांची आलिशान घरे आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement