Weather Update: विकेण्डला घाम फुटणार की कडाक्याची थंडी वाढणार? पुढचे 3 दिवस कसं राहणार हवामान?

Last Updated:
उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र, उत्तर प्रदेशात रेड अलर्ट, पंजाब हरियाणात ऑरेंज अलर्ट, महाराष्ट्रात तापमान स्थिर राहणार, धुळे जेऊरमध्ये किमान तापमान सर्वात कमी.
1/6
उत्तर भागात थंडीची लाट आणखी तीव्र होत आहे, महाराष्ट्रासाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यात किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र त्यानंतर हळूहळू तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते.

advertisement
2/6
18 ते 22 डिसेंबरदरम्यान उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये सकाळच्या वेळी दाट ते अतिदाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये दृश्यता अत्यंत कमी राहण्याची शक्यता असून, उत्तर प्रदेशात रेड अलर्ट तर पंजाब आणि हरियाणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडसह बिहार, झारखंड, ओडिशा आणि ईशान्य भारतातील काही राज्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

3/6
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतावर सध्या सबट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम सक्रिय असून, ती समुद्रसपाटीपासून सुमारे 12.6 किलोमीटर उंचीवर ताशी 100 नॉट्स वेगाने वाहत आहे. 19 डिसेंबरपासून हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

4/6
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास, पुढील तीन दिवस किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नसून, थंडीची तीव्रता सध्या स्थिर राहील. मात्र त्यानंतरच्या चार दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सकाळची थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे.

5/6
दरम्यान, हवामान विभागाने उत्तर भारतातील नागरिकांना विशेषतः पहाटेच्या वेळेत प्रवास करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात सध्या कोणताही धुक्याचा किंवा शीतलहरीचा इशारा नसला, तरी हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

6/6
महाराष्ट्रात पुढचे सात दिवस कोणताही धोक्याचा इशारा देण्यात आला नाही. महाराष्ट्रातील गारठा कायम राहणार आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 5 डिग्रीपर्यंत किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. धुळे, जेऊरमध्ये सर्वात कमी तापमान आहे.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement