Pune News: पोरांनी नायलॉन मांजा वापरल्यास पालकांची खैर नाही; संक्रांतीआधी पुणे पोलिसांचा कठोर पवित्रा

Last Updated:

नायलॉन मांजा अत्यंत धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असल्याने त्यामुळे गंभीर अपघात किंवा मृत्यू घडल्यास थेट 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल केला जाणार आहे.

नायलॉन मांजा बंदी (फाईल फोटो)
नायलॉन मांजा बंदी (फाईल फोटो)
पुणे: मकर संक्रांतीचा सण अद्याप महिनाभर लांब असली तरी पुण्याच्या आकाशात आत्तापासूनच पतंग दिसू लागले आहेत. मात्र, या आनंदाच्या सणाला नायलॉन आणि चायनीज मांजाच्या रूपाने जीवघेणी धार लागली असून, शहरभर या प्रतिबंधित मांजाची विक्री छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे चित्र आहे. हा मांजा दुचाकीस्वार, पादचारी आणि मुक्या पक्ष्यांच्या जिवावर बेतत असल्याने पुणे पोलिसांनी आता अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. केवळ मांजा विकणाऱ्यांवरच नव्हे, तर तो वापरणाऱ्यांवर आणि विशेषतः नायलॉन मांजा वापरून पतंग उडवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवरही गुन्हे दाखल करण्याचा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे.
नायलॉन मांजा अत्यंत धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असल्याने त्यामुळे गंभीर अपघात किंवा मृत्यू घडल्यास थेट 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल केला जाणार आहे. जर एखादा मुलगा अशा जीवघेण्या मांजाचा वापर करताना आढळला, तर त्याच्या या कृतीसाठी त्याच्या पालकांना कायदेशीररीत्या जबाबदार धरले जाईल. यामुळे त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असेल. राज्य शासनाने या मांजाच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर पूर्णतः बंदी घातली असली तरी शहराच्या अनेक भागांत, इमारतींच्या गच्चीवर आणि मैदानांमध्ये चोरट्या मार्गाने याचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
advertisement
या जीवघेण्या मांजामुळे शहरात यापूर्वी अनेक निष्पाप नागरिकांचा गळा कापला जाऊन मृत्यू झाला आहे. तर हजारो पक्षी कायमचे जायबंदी झाले आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली असून, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. कोणत्याही व्यक्तीने चायनीज किंवा नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक अथवा वापर केल्यास त्याला तुरुंगवासाची आणि मोठ्या दंडाची शिक्षा भोगावी लागू शकते.
advertisement
नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या परिसरात अशा प्रतिबंधित मांजाची विक्री किंवा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या '११२' या क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. केवळ एका मनोरंजनासाठी कोणाचा जीव धोक्यात येऊ नये. यासाठी पालकांनी आपल्या मुलांना अशा धोकादायक मांजापासून दूर ठेवावे आणि सण सुरक्षितपणे साजरा करावा, असेही कळकळीचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पोरांनी नायलॉन मांजा वापरल्यास पालकांची खैर नाही; संक्रांतीआधी पुणे पोलिसांचा कठोर पवित्रा
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement