विदर्भाला हुडहुडी! भंडारा, गोंदियात पारा घसरला, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Weather Forecast: राज्यात नोव्हेंबर अखेर थंडीचा जोर वाढणार आहे. विदर्भातही थंडीची तीव्रता वाढली असून किमान तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. तुरळक ठिकाणी पुढील काही दिवस धुक्यासह ढगाळ आकाश राहणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दोन दिवस आधी तापमानात घट झाली होती. काही जिल्ह्यांत ती घट कायम आहे. पण काही जिल्ह्यांत किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे. अमरावती, वर्धा, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांत निरभ्र आकाश असणार आहे. इतर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी लागेल.


