कुठं दिलासा तर कुठं अलर्ट, विदर्भात काय आहे आजचा पावसाचा अंदाज?

Last Updated:
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सतत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आजही काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
1/5
राज्यात परतीच्या पावसानं सर्वत्र जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांत विदर्भालाही सातत्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. आता पुन्हा विदर्भाला अलर्ट देण्यात आलाय.

advertisement
2/5
सप्टेंबर महिन्यातील गेले 15 दिवस परतीच्या पावसाने विदर्भात आपला मुक्काम ठोकला होता. मुसळधार पावसाने काही ठिकाणी जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले होते. तसेच शेतऱ्यांच्या पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे.

3/5
विदर्भात गेले काही दिवस हवामान विभागाकडून सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता. ता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

4/5
आज 1 ऑक्टोबरला सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

5/5
दरम्यान, काल 30 सप्टेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर काही ठिकाणी मध्यम सूर्यप्रकाश असल्याचे चित्र असून काही भागांत नागरिकांना उकाडा जाणवत आहे. पावसाने नुकसान झाले असले तरी राहलेल्या पिकांची मशागत करून ते व्यवस्थित करता येईल, या आशेवर आता शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement