सातारकरांसाठी 4 दिवस मुसळधार पावसाचे! लागोपाठ रेड आणि ऑरेंज अलर्ट

Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. रस्ते, नद्या, लहान-मोठे तलाव, ओढे, नाले पाण्यानं तुडुंब भरले आहेत. सातारा जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. सातारच्या पश्चिम भागातील तलाव दुथडी भरून वाहू लागले आहेत, अनेक धबधब्यांचा प्रवाहसुद्धा वाढलाय. (शुभम बोडके, प्रतिनिधी / सातारा)
1/5
हवामानशास्त्र विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या म्हणजेच 23 आणि 24 जुलैला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यानंतर पुढचे 2 दिवससुद्धा इथं ऑरेंज अलर्ट असेल. म्हणजेच सातारा जिल्ह्यात पुढचे 4 दिवस पावसाचे असणार आहेत. त्यामुळे सातारकरांनी सतर्क राहावं.

advertisement
2/5
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं पाण्याची आवक् वाढलीये. धरणात 60.42 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 57.41 टक्के भरलं आहे. 23 जुलैला सकाळी या धरणाच्या पायथा विद्युत ग्रहाचं 1 युनिट सुरू करून त्यातून 1050 क्यूसेक्स इतका विसर्ग करण्याचं नियोजित होतं.

3/5
जिल्ह्यातील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वेगानं वाढ झाल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस पडतोय.

4/5
खरंतर सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे विभागाला 23 जुलैला यलो अलर्ट देण्यात आला. तर कोल्हापुरात पावसानं थैमान घातल्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालीये.

5/5
अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
View All
advertisement