Shivray Waghnakh PHOTOS: अभिमानानं ऊर भरून यावा असा क्षण..! शिवरायांच्या वाघनखांची पहिली झलक
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh : छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रसिद्ध वाघनखं अनावरण सोहळा आज साताऱ्यात पार पडला. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या गनिमी युद्धात कोथळा बाहेर काढला होता. ती वाघनखं आज अखेर तमाम जनता-शिवप्रेमींना पाहण्यासाठी खुली झाली आहेत.
शिवप्रेमींची कित्येक दिवसांची प्रतिक्षा आज संपली. राजांची वाघनखं पाहून प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून यावा, असा हा क्षण होता. <a href="https://news18marathi.com/tag/chhatrapati-shivaji-maharaj/">छत्रपती शिवाजी महाराजांच्या</a> वाघनखं अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री आणि नेते उपस्थित होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वाघनखं <a href="https://news18marathi.com/national/">भारतात</a> आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे, त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. तसेच, वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा 14 लाख 8 हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले होते.


