साडी चोळीची ओटी अन् पैठणीचा मान, साताऱ्यात पार पडलं चक्क गाईचं डोहाळे जेवण

Last Updated:
साताऱ्यात एका हौशी शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गाईचं ओटी भरण केलंय. या अनोख्या डोहाळे जेवणाची संपूर्ण पंचक्रोशित चर्चा होतेय.
1/7
 एखाद्या विवाहितेचं पहिलं बाळंतपण म्हटलं की ओटी भरण आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो.  एका हौशी शेतकऱ्यानं चक्क आपल्या खिलार गाईचं डोहोळे जेवण केलंय.
एखाद्या विवाहितेचं पहिलं बाळंतपण म्हटलं की ओटी भरण आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो. साताऱ्यातील एका हौशी शेतकऱ्यानं चक्क आपल्या खिलार गाईचं डोहोळे जेवण केलंय.
advertisement
2/7
शशिकांत पवार यांनी अगदी पैठणी साडी, खणा नारळाची ओटी आणि विविध पदार्थांची मेजवानी अशा प्रकारे गौरी गाईचे लाड पुरवले. आता या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाची पंचक्रोशित चर्चा होतेय.

3/7
भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा दिला जातो. तसेच हिंदू धर्मात गाईला विशेष महत्त्व आहे. कृषी संस्कृतीत गाईचं महत्त्व असून पूर्वीपासून शेतकऱ्याच्या दारात गाय असायचीच.

4/7
सध्याच्या काळात देशी गाईंचं प्रमाण कमी झालं असलं तरी गाईंचं महत्त्व कायम आहे. निगडी येथील शेतकरी शशिकांत पवार यांच्याकडे एक खिलार गाय असून तिचं गौरी असं नाव आहे. ही गौरी गरोदर असल्याने तिची पोटच्या मुलीप्रमाणे हौस करण्याचा निर्णय शेतकरी पवार यांनी घेतला.

5/7
शेतकरी शशिकांत पवार यांनी गौरी गाईचं ओटी भरण अर्थात डोहाळे जेवण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पै-पाहुणे आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांना बोलावलं. गाईला पैठणी आणली आणि तिची महिलांनी खणा नारळानं ओठी भरण्यात आली.

6/7
गाईला खाण्यासाठी केळी, द्राक्ष, खजूर, गुळपोळी, शेंगदाणे, कलिंगड, त्याचबरोबर काकडी, गाजर आणि तिच्या आवडते इतर खाद्य पदार्थ देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

7/7
गौरी गाय ही आमच्या घरातील सदस्याप्रमाणे आहे. ती गर्भवती झाल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबाला खूप आनंद झाला. त्यामुळे आम्ही गौरीचं डोहाळे जेवण करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी एकत्र येत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाल्याचे शेतकरी पवार यांनी सांगितले. (शुभम बोडके, प्रतिनिधी)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement