Mumbai Weather: पुढील 24 तास महत्त्वाचे, मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार, कोकणातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Last Updated:
कोकणातील महत्वाच्या जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
1/5
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच कोकणातील महत्वाच्या जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. 24 जुलै 2025 रोजी पावसाने चांगलाच जोर धरलाय त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याबद्दल हवामान विभागाने सांगितलं आहे.

advertisement
2/5
मुंबईमध्ये आज काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शहरात पुन्हा एकदा वाहतूक कोंडी, जलभराव आणि सार्वजनिक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

3/5
नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ठिकठिकाणी जोरदार पावसामुळे शहरात पाणी साचण्याची शक्यता आहे. यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.वाऱ्याचा वेग सरासरी 30 ते 40 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. काही वेळा जोरदार पावसादरम्यान वाऱ्याचा वेग 45 किमी प्रतितासांपर्यंत जाऊ शकतो. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि झाडांच्या खाली, जलकाठावर किंवा उघड्या ठिकाणी उभं राहणं टाळावं, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केलं आहे.

4/5
पालघर जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. समुद्रालगत राहणाऱ्या लोकांनी सावध राहावं आणि मासेमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. जिल्ह्यातील खेड्यापाड्यांमध्ये विजेच्या किंवा झाडांच्या सळसळाटामुळे दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे.

5/5
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज देखील या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अती मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे डोंगराळ भाग, नदीकाठ आणि घाटमाथ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement