काँग्रेस आमदाराच्या लॉकरमध्ये 40 किलो सोन्याची बिस्किटे, चमचमलं 24 कॅरेट Gold; किंमत 50.33 कोटी

Last Updated:
EDने बेंगळुरूत काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या लॉकरमधून 50.33 कोटींचं सोनं जप्त केलं आहे. या कारवाईने देशात एकच खळबळ उडाली आहे.
1/9
बेंगळुरूत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत तब्बल 50.33 कोटींचं 24 कॅरेट सोनं जप्त केलं आहे. या छाप्यात मिळालेलं सोनं म्हणजे सुमारे 40 किलो वजनाची बिस्किटं, जी चल्लेकेरे येथील दोन लॉकरमधून हस्तगत करण्यात आली.

advertisement
2/9
ही कारवाई 9 ऑक्टोबर 2025 रोजी मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) 2002 अंतर्गत काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र आणि त्यांच्या सहयोगींविरुद्ध करण्यात आली. या ऑपरेशननंतर संपूर्ण देशात मोठी चर्चा रंगली आहे.

3/9
यापूर्वीही ईडीने या प्रकरणात 103 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. त्यात २१ किलो सोने, रोकड, दागिने, बँक खाती आणि उच्च श्रेणीची वाहने यांचा समावेश होता. आता नव्या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण जप्त मालमत्ता  १५० कोटींच्या वर गेली आहे.

4/9
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही शोधमोहीम गुन्ह्यातून मिळालेल्या अवैध उत्पन्नाचा (Proceeds of Crime) मागोवा घेण्यासाठी करण्यात आली, आणि ती मुख्य आरोपी आमदार के. सी. वीरेंद्र न्यायालयीन कोठडीत असतानाच पार पडली.

5/9
ईडीच्या चौकशीत उघड झाले की, के. सी. वीरेंद्र यांनी आपल्या कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीने अनेक ऑनलाइन सट्टेबाजी वेबसाइट्स- जसे King567, Raja567 इत्यादी चालवल्या होत्या. या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली.

6/9
या वेबसाइट्सद्वारे जमा झालेला पैसा FonePaisa सारख्या पेमेंट गेटवेद्वारे स्वीकारला जात असे. यानंतर हा पैसा “म्युल अकाउंट्स” म्हणजेच इतरांच्या नावाने उघडलेल्या बनावट बँक खात्यांद्वारे देशभरात फिरवण्यात येत असे.

7/9
ईडीच्या तपासात आणखी एक गंभीर गोष्ट समोर आली. या ऑनलाइन सट्टेबाजी अॅप्सचा देशभरातील अनेक सायबर गुन्ह्यांशी थेट संबंध आहे. गुन्हेगारांनी लहानशा मोबदल्यात लोकांच्या नावाने खोट्या खात्यांची निर्मिती करून त्यांचा वापर पैसे वळवण्यासाठी आणि गुन्हे लपवण्यासाठी केला.

8/9
या बेकायदेशीर सट्टेबाजी वेबसाइट्सचा एकूण आर्थिक उलाढाल  2,000 कोटींपेक्षा जास्त असल्याचं ईडीच्या अहवालात नमूद आहे. तपासात असेही आढळले की- के. सी. वीरेंद्र, त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांनी परदेश प्रवास, व्हिसा फी, हॉटेल खर्च आणि आतिथ्य सेवांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. आणि तो पैसा म्युल अकाउंट्समधूनच वळवला गेला होता.

9/9
याशिवाय मार्केटिंग, बल्क एसएमएस सेवा, वेबसाइट होस्टिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) इत्यादींसाठीही या बेकायदेशीर निधीचा वापर करण्यात आला. ईडीकडे असलेल्या पुराव्यांनुसार  हे सर्व पैसे ऑनलाइन सट्टेबाजीमधून कमावले गेले.आणि त्यांचा मूळ स्रोत लपवण्यासाठी अनेक खात्यांमधून त्यांची उलाढाल करण्यात आली.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement