देशातील मोठ्या सरकारी बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना धक्का! पहा कोणाला होईल नुकसान
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
PNB FD Rates: या बदलानंतर, सामान्य नागरिकांना पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.50% ते 7.10% पर्यंत व्याज मिळेल.
Punjab National Bank FD Rates: देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने पुन्हा एकदा मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन व्याजदर 1 मे 2025 पासून लागू होतील. तसंच, हा बदल अशा किरकोळ ग्राहकांना लागू होईल ज्यांच्या ठेवी 3 कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत. अशाप्रकारे, आता सामान्य ग्राहकांना एफडीवर 3.50% ते 7.10 पर्यंत व्याज मिळेल.
advertisement
advertisement
advertisement
180 ते 270 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदर आता 6.25% वरून 6% पर्यंत कमी करण्यात आला आहे. त्याच वेळी, 271 ते 299 दिवसांच्या कालावधीसाठी, व्याजदर आता 6.5% वरून 6.25% पर्यंत कमी झाला आहे. तर 303 दिवसांच्या एफडीसाठी व्याजदर आता 6.4% वरून 6.15% पर्यंत कमी झाला आहे. तसेच, 304 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी, व्याजदर 6.5% वरून 6.25% पर्यंत कमी झाला आहे. त्याच वेळी, 1 वर्षाच्या एफडीसाठी व्याजदर आता 6.8% वरून 6.7% पर्यंत कमी झाला आहे.
advertisement
ज्येष्ठ नागरिकांसाठी लेटेस्ट व्याजदर : 60 वर्षांवरील आणि 80 वर्षांखालील ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 3 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी सामान्य दरांपेक्षा 0.50% जास्त आणि 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी 0.80% जास्त व्याजदर मिळेल. अशाप्रकारे, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 4.00% ते 7.60% पर्यंत आहेत.
advertisement