"मंदीचं सावट तरी गुंतवणुकीची संधी" 4 सेक्टरमधून करा छप्परफाड कमाई, तज्ज्ञांनी थेट सांगितलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारतीय बाजाराचे मार्केट कॅपिटलायझेशन 1 ट्रिलियन डॉलरने बुडाले आहे. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरू नये. हीच गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे कुठल्या सेक्टरमध्ये शेअर्स घ्यावे त्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई: भारतीय बाजाराचे मार्केट कॅपिटलायझेशन 1 ट्रिलियन डॉलरने बुडाले आहे. चीनमधील शेअर मार्केट 2 ट्रिलियन डॉलरने वाढले आहे. 1996 मध्ये सर्वात जास्त शेअर मार्केट कोसळलं होतं. पाच महिने सलग घसरण होती. तोही रेकॉर्ड यावेळी मोडला जाणार का असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावत आहे. त्यामुळे शेअर मार्केटवर दबाव तर आहेच शिवाय पैसे गुंतवावे की नाही असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. याचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे.
advertisement
advertisement
सध्या टेक सेक्टरला जरी मोठा फटका बसला असला तरी शॉर्ट टर्म गुंतवणूक न करता लाँग टर्मच्या दृष्टीनं गुंतवणूक करण्याचा विचार करायला हवा. असं विजयकुमार म्हणाले. मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, पुढील काही महिन्यांत बाजार पुन्हा सुधारेल. शेअर मार्केटने नेहमीच दीर्घकालीन गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करुन दिली आहे.
advertisement
advertisement
IT सेक्टर्सच्या शेअर्समधून उत्तरम दीर्घकालीन रिटर्न्स मिळू शकतात. स्टार्टअपच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना मात्र चांगला अभ्यास करायला हवा. बँकिंग सेक्टरने कायमच स्टेबल रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर स्टेबल रिटर्न्स हवे असतील तर ही चांगली संधी आहे. शिवाय चांगल्या कंपन्यांचे शेअर्स सध्या मार्केट क्रॅशमुळे अर्ध्या किंमतीवर आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी आहे.
advertisement
advertisement