Monsoon Shopping: फक्त 50 रुपयांपासून मिळतात छत्री, पावसाळी खरेदीसाठी मुंबईतील 5 बेस्ट मार्केट

Last Updated:
Monsoon Shopping: पावसाळा सुरू झाला की खरेदीसाठी अनेकजण मार्केट जवळ करतात. मुंबईतील 5 बेस्ट मार्केटबाबत जाणून घेऊ.
1/7
पावसाळा सूरू झाला असून पावसाळी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. मुंबईत अनेकजण शॉपिंगसाठी आवर्जून बाहेर पडतात. तुम्हाला देखील पावसाळ्यातील रेनकोट, छत्री आणि इतर वस्तूंची खरेदी करायची असेल, तर मुंबईतील 5 मार्केट्स उत्तम पर्याय ठरतील.

advertisement
2/7
क्रॉफर्ड मार्केट : पावसाळी वस्त्रांसाठी प्रसिद्ध असलेले हे मार्केट भायखळा आणि मरीन लाईन्सजवळ आहे. येथे विविध रंग, आकार आणि दर्जाच्या छत्र्या 50 रुपयांपासून उपलब्ध आहेत. साधे रेनकोट 250–350 दरम्यान मिळतात. टु-व्हीलर रायडर्ससाठी खास डिझाइन असलेले रेनकोटही येथे विक्रीस आहेत.

3/7
कोलाबा कॉजवे: फॅशनेबल आणि बजेटमध्ये खरेदीसाठी कोलाबा मार्केट ही उत्तम जागा आहे. या ठिकाणी 200–400 रुपयात छत्री तर रेनकोट 250 रुपयांच्या आसपास सहज मिळतात. महिला आणि मुलांसाठी आकर्षक डिझाइन्समध्ये छत्र्या उपलब्ध आहेत. अनेक पर्यटक आणि मुंबईकर इथे खास पावसाळी खरेदीसाठी येतात.

4/7
झवेरी बाजार, काळबादेवी परिसर: मुंबईतील जुनी छत्री विक्रेते याच भागात आहेत. येथील नीलम कार्पोरेशन, क्लासिक अम्ब्रेला सारख्या दुकानांत टिकाऊ आणि स्वस्त छत्र्या मिळतात. अगदी 90 ते 244 रुपयांत तुम्ही छत्री घेऊ शकता. दरम्यान जुनी पण विश्वासार्ह दुकाने असल्यामुळे ग्राहकांचा विश्वास कायम आहे.

5/7
चोरबाजार : युनिक आणि थोड्या हटके वस्तू शोधणाऱ्यांसाठी हे मार्केट योग्य आहे. येथे थोडी हुशारी आणि सौदाशीर वागणूक दिल्यास 250 पेक्षा कमी दरात छत्री, रेनकोट, गम-बूट्स, रेनशूज सहज मिळू शकतात. काही वस्तू सेकंड-हँड असतात, पण योग्यरित्या तपासून घेतल्यास उत्तम डील होऊ शकते.

6/7
बांद्रा लिंकिंग रोड : बांद्रा हे खरेदीचं हॉटस्पॉट असून पावसाळी वस्त्रांसाठीही तितकंच प्रसिद्ध आहे. स्टायलिश छत्र्या, रेनकोट, पाण्यापासून सुरक्षित चप्पल आणि स्लीपर 200–300 रुपयांत मिळतात. महिलांसाठी फॅशनेबल रेनकोट आणि लहान मुलांसाठी रंगीबेरंगी छत्र्या येथे सहज उपलब्ध आहेत.

7/7
सर्व बाजारांमध्ये सौदाशीर खरेदी करणे फायदेशीर ठरते. छत्री, रेनकोट खरेदी करताना दर्जा आणि टिकाव तपासणे गरजेचे आहे. सकाळी लवकर गेल्यास उत्तम स्टॉक आणि कमी गर्दीचा फायदा मिळू शकतो.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement