विमानप्रवासाचं स्वप्न खरं होणार, फक्त 150 रुपयांमध्ये बुक करा विमानाचं तिकीट, जाणून घ्या कसं....
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
flight ticket in just 150 rupees : आपल्यापैकी अनेकजण असे असतात, ज्यांना विमानाने प्रवास करण्याची इच्छा असते. आपला वेळ वाचावा आणि एकदातरी विमानात बसण्याचा अनुभव घेता यावा, असा अनेकदा यामागचा उद्देश असतो.
विमानाचं तिकीट भरपूर असल्याने बरेच लोक याऐवजी बस किंवा रेल्वेचाच पर्याय निवडतात. पण हवाई प्रवास सर्वांसाठी सुलभ व्हावा या उद्देशाने केंद्र सरकार उडान (UDAN) ही योजना राबवत आहे. ही योजना प्रादेशिक हवाई सेवांना चालना देण्यासाठी आणि सामान्य लोकांना विमानाने प्रवास करण्यास सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
advertisement
ही उडान योजना केंद्र सरकारने 21 ऑक्टोबर 2016 रोजी लागू केली. त्यामुळे देशातील अनेक शहरांच्या विमान तिकिटांच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम-RCS मध्ये सहभागी झालेल्या विमान कंपन्यांनी 50 मिनिटांपेक्षा कमी प्रवासाचा कालावधी असलेल्या मार्गांवरील तिकीट दर मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या मार्गावरील तिकीटाचे दर परवडणारे असावे यासाठी सरकारने उडान योजना सुरू केल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. उडान योजनेंतर्गत लोकांना स्वस्त दरात विमान प्रवास करण्याची संधी मिळते. यासोबतच सरकारकडून विमान कंपन्यांना व्हायबिलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) देण्यात येत आहे.