Weather Alert: पुन्हा धो धो पाऊस की श्रावणात विश्रांती? पश्चिम महाराष्ट्रातली हवा बदलली, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Alert: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात श्रावण सरी बरसण्याचा अंदाज आहे.
1/7
राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी, काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरी कोसळत आहेत. आज 1 ऑगस्ट रोजी विदर्भात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. तसेच उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह तुरळक सरींची शक्यता आहे.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. घाटमाथ्यावर आणि धरणक्षेत्रात देखील पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील 24 तासात पुणे जिल्ह्यात 1 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानाचा पारा 26.8 अंश सेल्सिअस होता. पुढील 24 तासात संपूर्ण पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्‍यता असून कमाल तापमान 27 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.

3/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज साताऱ्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहिल. सातारा जिह्यात रिमझिम सरिंची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 26.7 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर राहील. तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप राहील.

5/7
सोलापूर जिल्हात देखील गुरुवरी पावसाची उघडीप राहिली. 29.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज तापामानाचा पारा 32 अंशावर राहण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.

6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 0.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 तर कमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.

7/7
ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाने उघडीप दिली असून राज्यात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या उघडिपीसह तापमानात चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement