तो परत आलाय! पश्चिम महाराष्ट्रात 48 तास महत्त्वाचे, या भागात वादळी पावसाचा अंदाज
- Reported by:Shivani Dhumal
- Published by:News18 Marathi
Last Updated:
राज्यात परतीच्या मान्सूनने दमदार हजेरी लावलीये. पुढील 2 दिवस राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही वादळी वारे, मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
advertisement
सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील तूर, उडीद पिकांच्या काढणीला या पावसामुळे ब्रेक लागला आहे. मिरज, जत, तासगाव, शिराळा, आटपाडी, पलूस, कडेगाव या भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांगलीत आज 25 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
advertisement
advertisement









