Dream11 ला 5 जणांनी हॅक तर नाही केलं? एकच राज्य पण केला मोठा गेम!
- Published by:sachin Salve
Last Updated:
आपलंही नशीब उजळेल, आपणही करोडपती होऊ या आशेनं अनेक तरुण टीम लावत असतात. पण जर एकाच जिल्ह्यातील....
आयपीएलचा सिझन सध्या सुरू आहे. एकीकडे प्रत्येक टीममध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. तर दुसरीकडे फॅन्टसी एपवर अनेक जण करोडपती होण्यासाठी आपलं नशीब आजमावत आहे. ३९ रुपये, ४९ रुपये लावून एका रात्री काही जण करोडपती झाले. त्यामुळे आपलंही नशीब उजळेल, आपणही करोडपती होऊ या आशेनं अनेक तरुण टीम लावत असतात. पण जर एकाच जिल्ह्यातील ५ तरुण ड्रीमवर ११ करोडपती झाले, हे जर सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.
advertisement
झारखंडमध्ये मागील काही दिवसांपासून Dream 11 या फॅन्टसी एपवर एक नव्हे दोन नव्हे तर ५ तरुण रातोरात करोडपती झाल्याची माहिती समोर आली आहे. चतरा परिसरातील शाहिद आणि पलामू भागातील रवी मेहता या दोन तरुणांनी सर्वाधिक प्रत्येकी ३ कोटी रुपये जिंकले आहे. तर इतर ३ तरुणांनी प्रत्येकी एक कोटी रुपये जिंकले आहे. पाचही तरुण हे गरीब घरातले होते, एका रात्रीत ते गरिबीतून ते श्रीमंत झाले.
advertisement
टेलर शाहिदने जिंकले ३ कोटी रुपये - मोहम्मद शाहिद नावाच्या तरुणाने ड्रीम 11 वर अलीकडेच एक टीम लावली होती. मोहम्मद शाहिद हा चतरा इथं टेलर म्हणून काम करतो. टेलर काम करणारा मोहम्मद शाहिदने आयपीएलच्या पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स मॅचवर ३ कोटी रुपये जिंकले. त्याने सारा खानम नावाने ४ टीम तयार केल्या होत्या. त्याच्या चारही टीम जिंकल्या. पहिली टीम ही ३ कोटी रुपयांची प्राईज मनी जिंकली. तर दुसरी ८५०० रुपये, तिसरी टीम ५००० रुपये आणि चौथ्या टीमने ३५०० रुपये जिंकले. शाहिदने 1358 पाँईटने घेऊन करोडपती झाला. करोडपती झाल्यानंतर शाहिद हा एका छोट्या घरात राहत होता, आता तो रांचीला मोठ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला.
advertisement
मजूर झाला करोडपती - तर पालूम जिल्ह्यात मजुरी करणाऱ्याचा मुलगा रवी मेहता ड्रीम ११ वर करोडपती झाला. पालूम इथं प्रखंड सुगा कौडिया इथं राहणारा रवी मेहता याने गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स मॅचसाठी ड्रीम ११ एपमध्ये टीम लावली होती. रवीने या मॅचमध्ये १ कोटी रुपये जिंकले. धक्कादायक म्हणजे, रवी मेहता याने आतापर्यंत ड्रीम ११ वर पाच लाख रुपये हरला आहे. त्याचं डाल्टनगंज इथं चियांकी रेल्वे स्टेशन परिसरात किराना दुकान आहे. पण अखेरीस त्याने ड्रीम ११ एपवर १ कोटी रुपये जिंकले.
advertisement
Dream 11 तर झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील कमाटांड गावात राहणाऱ्या सोनू कुमार नावाच्या आठवी पास तरुणानेही एक कोटी जिंकल्याची किमया साधली. २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या मॅचमध्ये सोनूने ४९ रुपयांमध्ये टीम लावली. त्याची टीमही पहिली आली. त्याने या मॅचमध्ये १ कोटी रुपये जिंकले होते.
advertisement
advertisement
तर, पाचवा तरुण हा चतरा शहरातून आला आहे. कुरैशी मोहल्ला इथं राहणाऱ्या मोहम्मद रिजवान नावाच्या ड्रायव्हरने २०२४ मध्ये ड्रीम ११ एपवर १ कोटी रुपये जिंकले होते. २०२४ च्या आयपीएल हंगामामध्ये कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद मॅच होती. या मॅचमध्ये त्याने ४९ रुपयांमध्ये टीम लावली होती. त्याची ही टीम पहिली आणि एका रात्रीत ड्रायव्हर मोहम्मद रिचवान हा करोडपती झाला.