Israel Hezbollah Attack : आकाशात भिडले हिजबुल्लाह-इज्रायल; युद्धाचे थरारक Photo पाहून हैराण व्हाल!
- Published by:Shreyas
Last Updated:
इज्रायलने हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर 100 लढाऊ विमानांनी हल्ला केल्यामुळे मिडल इस्टमध्ये अचानक तणाव वाढला आहे. यानंतर हिजबुल्लाहने इज्रायली लष्कराच्या ठिकाणांवर 300 रॉकेटनी प्रतिहल्ला केला. जवळपास 6 तास आकाशामध्ये रॉकेट आणि बॉम्बचा पाऊस पडत होता. युद्धाचे हे थरारक फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
शांतता वार्ता सुरू असतानाच रविवारी सकाळी इज्रायल लष्कराने आपण 100 फायटर जेट पाठवून हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ला केल्याचं सांगितलं. ही कारवाई स्वसंरक्षणासाठी करण्यात आल्याचंही इज्रायलच्या लष्कराने स्पष्ट केलं. बीबीसीच्या रिपोर्टनुसार 2006 नंतर इज्रायलकडून केला गेलेला हा सगळ्यात मोठा हल्ला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement