Menstruation In Space : अंतराळात महिला एस्ट्रोनॉट्स मासिक पाळीदरम्यान काय करतात? कशी असते त्यावेळेची परिस्थीती?

Last Updated:
how women astronaught manage periods in space : विचार करा, जर एखादी महिला अंतराळात असेल. जिथे गुरुत्वाकर्षण नाही, साधनांची कमतरता आहे आणि शरीरावरही वेगळा ताण असतो तिथे मासिक पाळी दरम्यान महिला काय करत असतील?
1/8
जगभरातील अनेक महिला दर महिन्याला मासिक पाळीचा अनुभव घेतात. फक्त काही लहान मुली आणि म्हाताऱ्या महिला सोडल्या तर सगळ्यांना या प्रत्येक महिन्याला या अनुभवातून जावं लागतं. पण काही महिलांना असा यावेळी मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तर अनेकांना याचे व्यवस्थापन करणं हेच मोठं आव्हान वाटतं.

advertisement
2/8
मग विचार करा, जर एखादी महिला अंतराळात असेल. जिथे गुरुत्वाकर्षण नाही, साधनांची कमतरता आहे आणि शरीरावरही वेगळा ताण असतो तिथे मासिक पाळी दरम्यान महिला काय करत असतील?

3/8
आज अंतराळ संशोधनात महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हा प्रश्न आता केवळ उत्सुकतेचा नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरत आहे.

4/8
1963 मध्ये वेलेंटीना तेरेश्कोव्हा या पहिल्या महिला अंतराळात गेल्यानंतर आतापर्यंत 70 पेक्षा जास्त महिला अंतराळात प्रवास करून आल्या आहेत. मात्र एक काळ असा होता की, मासिक पाळीमुळे महिलांना अंतराळ मोहिमांपासून दूर ठेवलं जायचं. कारण सांगितलं जायचं हार्मोन्समधील बदल आणि मायक्रोग्रॅव्हिटीचा शरीरावर होणारा परिणाम.

5/8
संशोधनात हे स्पष्ट झालं आहे की मायक्रोग्रॅव्हिटीचा मासिक पाळीच्या रक्तस्रावावर फारसा परिणाम होत नाही. पृथ्वीवर जसं महिलांना पाळी होते, तशीच ती अंतराळातही होते. आणि आजवर एकाही महिला अंतराळवीराने अंतराळ प्रवासादरम्यान मासिक पाळीमुळे कोणतीही मोठी अडचण आल्याचं नोंदवलेलं नाही.

6/8
मग नक्की काय उपाय करतात महिला अंतराळवीर?गायनॅकोलॉजिस्टच्या मते, महिलांना दोन पर्याय असतात एकतर पाळी होऊ द्यावी किंवा गर्भनिरोधक गोळ्यांमधून ती काही काळासाठी थांबवावी. बर्‍याच अंतराळवीर महिला दुसरा पर्याय म्हणजे एस्ट्रोजनयुक्त कॉन्ट्रासेप्टिव गोळ्या वापरतात, ज्यामुळे ब्लीडिंग थांबवता येतं.
मग नक्की काय उपाय करतात महिला अंतराळवीर?
गायनॅकोलॉजिस्टच्या मते, महिलांना दोन पर्याय असतात एकतर पाळी होऊ द्यावी किंवा गर्भनिरोधक गोळ्यांमधून ती काही काळासाठी थांबवावी. बर्‍याच अंतराळवीर महिला दुसरा पर्याय म्हणजे एस्ट्रोजनयुक्त कॉन्ट्रासेप्टिव गोळ्या वापरतात, ज्यामुळे ब्लीडिंग थांबवता येतं.
advertisement
7/8
अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) मध्ये जागेची आणि वजनाची मर्यादा असते. त्यामुळे कमी संसाधनांत पाळीचं व्यवस्थापन करणे हे खऱ्या अर्थाने नियोजन आणि वैद्यकीय सल्ल्याचा उत्तम समन्वय असतो.

8/8
अंतराळ मोहिमांमध्ये महिलांची संख्या वाढत असताना, मासिक पाळीसारख्या मुद्द्यांचं वैज्ञानिकदृष्ट्या व्यवस्थापन होणं हे एक मोठं पाऊल आहे. केवळ विज्ञान नाही, तर महिला आरोग्याच्या दिशेनेही ही एक चांगली वाटचाल आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement