Indian Railway : Waiting Ticket संदर्भात रेल्वेचे निमय बदलले, प्रवाशाचं तिकिट वेटिंगवर असेल तर...
- Published by:Devika Shinde
Last Updated:
उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई किंवा सणासुदीच्या काळात लाखो प्रवासी आपल्या कुटुंबासह रेल्वेने प्रवास करताना दिसतात. पण अशा गर्दीच्या काळात ‘वेटिंग लिस्ट’मध्ये सीट असणं हे प्रवाशांसाठी एक सामान्य गोष्ट असते.
advertisement
advertisement
advertisement
1 मे 2025 पासून लागू वेटिंग तिकिटासाठी नविन नियम काय सांगतात?
भारतीय रेल्वेने 1 मे 2025 पासून वेटिंग लिस्ट तिकिटांबाबत कडक नियम अंमलात आणले आहेत. यानुसार, कुठलाही प्रवासी ज्याचं तिकीट वेटिंग लिस्टवर आहे त्यांनी तिकिट ऑनलाइन काढलं असो किंवा काउंटरवरून घेतलेलं असोत. आता त्यांना आरक्षित डब्यात (स्लीपर किंवा एसी) चढण्यास परवानगी नाही. अशा प्रवाशांनी फक्त सामान्य (unreserved) डब्यांमध्येच प्रवास करावा लागेल.

एका PNR वर अर्ध्या सीट वेटिंग आणि अर्ध्या कन्फर्म तिकिटं? आता काय होणार?
समजा, एका कुटुंबात चार जण प्रवास करत आहेत आणि त्यांच्या PNR वर दोन तिकिटं कन्फर्म आहेत आणि दोन वेटिंग. तर अशा वेळी, वेटिंग लिस्टवर असलेले प्रवासी आरक्षित डब्यात चढू शकत नाहीत. त्यांनी जर आरक्षित डब्यात प्रवेश केला, तर ते अवैध प्रवासी मानले जातील आणि त्यांच्यावर दंडही आकारला जाऊ शकतो.

TTE किती दंड लावणार?
रेल्वेने TTE (ट्रॅव्हलिंग टिकट एक्झामिनर) यांना हे नियम कडकपणे अंमलात आणण्याचे आदेश दिले आहेत. जर वेटिंग तिकीट असलेला प्रवासी आरक्षित डब्यात आढळला, तर AC डब्यात दंड ₹440 पर्यंत आणि स्लीपर डब्यात ₹250 पर्यंत दंड आकारला जाईल. त्याशिवाय, प्रवाशाला पुढच्या स्थानकावर उतरवलं जाऊ शकतं आणि प्रत्यक्ष प्रवासाचा भाडेदेखील आकारला जाऊ शकतो.

प्रवाशांनी आता काय काळजी घ्यावी?
प्रवासापूर्वी सर्व प्रवाशांची तिकिटं कन्फर्म आहेत का, हे खात्रीने तपासा.
जर वेटिंग तिकिटं आहेत, तर सामान्य डब्यातून प्रवास करण्याचा विचार करा.
चार्ट तयार झाल्यानंतर करंट बुकिंग तपासा, कधी-कधी तिकिटं उपलब्ध होतात.
नव्या नियमांची माहिती असणं आणि तशीच तयारी करणं यामुळे अडचणी टाळता येतात.