महाराष्ट्राची शान जगभरात! 'या' तिखट, चटकदार पदार्थाने मिळवला जागतिक नाश्त्यांच्या यादीत मानाचं स्थान!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Best Breakfasts In The World : 'टेस्ट ॲटलास' ने जाहीर केलेल्या 'जगातील ५० सर्वोत्तम नाश्त्यांच्या' यादीत भारताच्या तीन लोकप्रिय पदार्थांनी आपलं स्थान पटकावलं आहे, ज्यामुळे भारतीय खाद्यसंस्कृतीचा डंका जगभरात वाजला आहे!
advertisement
advertisement
मिसळ पावबद्दल बोलताना 'टेस्ट ॲटलास'ने म्हटले आहे की, "खरी मिसळ पाव तिखट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती कुरकुरीत असली पाहिजे. दिसताना ती एक कलाकृतीच वाटायला हवी, भरपूर रंगांनी भरलेली, साधारणपणे लाल, तपकिरी, केशरी आणि हिरव्या रंगांची." हे वर्णन मिसळ पावच्या लोकप्रियतेचं आणि तिच्या विविधतेचं उत्तम उदाहरण आहे.
advertisement
या यादीतील पराठा आणि छोले भटुरे हे दोन्ही पारंपरिक उत्तर भारतीय पदार्थ आहेत. त्यांची लोकप्रियता केवळ उत्तर भारतातच नाही, तर देशाच्या इतर भागांमध्येही ते खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे स्वतःचे प्रादेशिक प्रकारही आहेत. दिल्लीतील स्ट्रीट फूडमध्ये छोले भटुरे हे सर्वात उत्साहवर्धक पदार्थांपैकी एक मानले जातात.
advertisement
'टेस्ट ॲटलास'ने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर केवळ टॉप ५० नाश्त्यांची नावे जाहीर केली असली तरी, त्यांच्या वेबसाइटवर ५१ ते १०० पर्यंतच्या रँकिंगमध्येही अनेक भारतीय पदार्थ समाविष्ट आहेत. या यादीत निहारी, श्रीखंड आणि पालक पनीर यांसारखे भारतीय पदार्थही आहेत. याआधीही 'टेस्ट ॲटलास'च्या 'जगातील सर्वोत्तम ब्रेड'च्या यादीत अनेक भारतीय खाद्यपदार्थांचा समावेश होता.
advertisement