मृत्यूच्या एक दिवसआधीच केली होती सर्व तयारी, काय होती नॉस्ट्रॅडेमसची शेवटची भविष्यवाणी

Last Updated:
Nostradamus Predictions : 2 जुलै हा जगात नेहमीच चर्चेत असलेल्या नॉस्ट्रॅडेमसचा मृत्यूदिन. त्यानं भविष्यवाणीवर पुस्तक लिहिलं आहे. ज्यात त्याने धक्कादायक भविष्यवाणी केल्या आहेत. त्याची बरीच भाकीतं खरी ठरली आहेत.
1/11
नॉस्ट्रॅडेमसचा जन्म सोळाव्या शतकात 1503 मध्ये फ्रान्समधील सेंट रेमी या छोट्याशा गावात झाला. लहानपणापासूनच त्याला अभ्यासाची विशेष आवड होती. लॅटिन, ग्रीक आणि हिब्रू भाषांव्यतिरिक्त त्यानं गणित, शरीरशास्त्र आणि ज्योतिष यासारख्या गूढ विषयांतही विशेष प्रभुत्व मिळवलं होतं.

advertisement
2/11
किशोरवयापासूनच त्याने भविष्य सांगायला सुरुवात केली. मात्र हे त्याच्या पालकांसाठी चिंतेचं होतं. कारण त्या काळी मूलतत्त्ववादी ख्रिश्चन या ज्ञानाला अनुकूलतेनं पाहत नव्हते.

3/11
ज्योतिषशास्त्रावरून त्याचं लक्ष वळवण्यासाठी त्याला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मॉन्ट पेलियरला पाठवलं. 3 वर्षांचा अभ्यास पूर्ण करून तो डॉक्टर झाला. पुढे त्याच महाविद्यालयात शिक्षक झाला.

4/11
पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तो युरोपला गेला आणि दुसरं लग्न केलं. या काळात तो पुन्हा भविष्यवक्ता झाला.त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. असं म्हणतात की, एकदा तो एका मित्रासोबत इटलीच्या रस्त्यावर फिरत होता. तेव्हा गर्दीत एका तरुणाला त्याने डोकं टेकवून आदरपूर्वक अभिवादन केलं.

5/11
हे आश्चर्यकारक होतं, कारण तो त्या तरुणाला ओळखतही नव्हता. जेव्हा मित्राने असं का केलं विचारलं. तेव्हा तो म्हणाला की, ही व्यक्ती पोप बनणार आहे. तो तरुण फेलिस पेरेट्टी होता, जो 1585 मध्ये पोप बनला होता.

6/11
1550 मध्ये त्याने डॉक्टरी पेशा सोडला आणि ज्योतिषाचा अभ्यास सुरू केला. त्यानं त्याचं वार्षिक पंचांग काढण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ग्रहांची स्थिती, हवामान आणि पिके इत्यादींबद्दल अंदाज होते. त्यात केलेले दावे बहुतांश खरे होते. मग त्याने भविष्यवाण्यांशी संबंधित पुस्तकाचा पहिला भाग लिहिला.

7/11
त्याचं पुस्तक प्रथम फ्रेंच नंतर इंग्रजी, जर्मन, इटालियन, रोमन आणि ग्रीक भाषांमध्ये प्रकाशित झाला. त्याचं भविष्यवाणीवरील पुस्तकाचा सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये समावेश आहे. जगातील अनेक भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं आहे. त्याच्या पुस्तकाचं भाषांतर करताना लोक मनमानी दावे करतात, असं म्हटलं जातं.

8/11
त्याची आयुष्याची शेवटची वर्षे दुःखात गेली. फ्रेंच न्याय विभागाने तो जादूटोणा करत होता की नाही याचा तपास केला. परंतु तपासात तो ज्योतिषशास्त्रात पारंगत असल्याचं निष्पन्न झालं.

9/11
त्याला मृत्यूची पूर्वकल्पना होती. आपल्या मृत्यूची तारीख आणि वेळ आधीच सांगितली होती. 17 जून 1566 रोजी त्यानं त्याचं मृत्युपत्र तयार केलं. 01 जुलै रोजी पुजाऱ्याला बोलावून त्यानं अंतिम संस्काराबाबत सांगितलं. 02 जुलै 1566 रोजी त्याचं निधन झालं.

10/11
त्याच्या भविष्यवाणीत कोणत्याही विषयाचा किंवा नावाचा थेट उल्लेख नसला तरी, सांकेतिक दावे पहिलं महायुद्ध, नेपोलियन, हिटलर आणि केनेडी इत्यादी घटनांशी संबंधित असल्याचं पाहिलं गेलं. त्याच्या काही भविष्यवाणी इतक्या गुंतागुंतीच्या आहेत समजणं सोपं नाही.

11/11
लोक सहसा वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या भविष्यवाण्यांचा अर्थ लावतात.  तज्ज्ञांनी त्याच्या अनेक भविष्यवाणी तिसरं महायुद्ध आणि जगाच्या विनाशाचे संकेत देत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्याच्या बऱ्याच भविष्यवाणी खऱ्या ठरल्या. पण सर्वच अंदाज खरे ठरले नाही. (सर्व फोटो : संग्रहित)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement