ही कसली दिवाळी साफसफाई, 4 लाखांचं सोनं दिलं कचऱ्यात अन् बसले बोंबलत, सगळीकडे शोधलं, शेवटी...

Last Updated:
दिवाळी येणार, दिवाळी येणार म्हणता म्हणता सरली दिवाळी. या दिव्यांच्या सणानिमित्त कुटुंब एकत्र आले खरे, परंतु काहीजणांचं आयुष्य सुखानं प्रकाशमय झालं, तर काहीजणांच्या आयुष्यात मात्र अंध:कार पसरला. एका कुटुंबानं तर दिवाळीसाठी घर अगदी चकाचक केलं होतं. धुळीचा एक कणही कुठं दिसणार नाही, अशी त्यांनी साफसफाई केली. परंतु या सफाईत त्यांच्याकडून मोठी चूक घडली. एवढी मोठी चूक की, त्यांची दिवाळी दु:खात सुरु झाली. नेमकं काय घडलं, पाहूया. (रवी पायक, प्रतिनिधी / भीलवाडा)
1/5
अनेकदा असं होतं की, आपण स्वच्छ कचरा काढण्याच्या नादात त्यात एखादी महत्त्वाची वस्तू घालवून बसतो. लहानसं कानातलं किंवा नाकातली चमकी कचऱ्यात जाणं शक्य आहे. परंतु किलोभर किंवा लाखोंचे दागिने कचऱ्यात जातील याचा आपण कधी झोपेतही विचार करू शकत नाही. एका कुटुंबाच्या हातून चक्क हीच अशक्य वाटणारी चूक घडली.

advertisement
2/5
दिवाळीनिमित्त घराची साफसफाई अगदी जोमानं सुरू होती. त्यात चुकून या कुटुंबियांनी तब्बल 4 लाखांचे सोन्याचे दागिने कचऱ्यात फेकून दिले. याबाबत कोणाच्या काहीच लक्षात आलं नाही. अगदी कचरा डंपिंग ग्राऊंडमध्ये जाईपर्यंत घरातल्या एखाही सदस्याला कळलं नाही की, घरात दागिनेच नाही आहेत. जेव्हा ते दिवाळीला दागिने घालायला गेले...तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

3/5
घरातून दागिने गायब असल्याचं कळलं आणि आपण ते कचऱ्यात टाकले हे लक्षात आलं तेव्हा मात्र हे कुटुंब हादरलं. त्यांनी तातडीनं याबाबत महानगरपालिकेला माहिती दिली. महापौरांपर्यंत ही माहिती पोहोचली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन महापौर राकेश पाठक यांनी दागिने शोधण्यासाठी एक स्पेशल टीम तयार केली. 

4/5
अथक प्रयत्न करून कचरा स्टॅंडवर कचऱ्याचे ढिग उपसण्यात आले. कचऱ्याची दुर्गंधी असह्य होती, तरी त्यातल्या कणाकणाची पाहणी झाली. अखेर महापौरांनी नेमलेल्या स्पेशल टीमनं सोनं शोधून काढलंच. 

5/5
चिराग शर्मा यांच्या कुटुंबियांचं हे सोनं होतं. जेव्हा ते सापडल्याचं त्यांना कळलं तेव्हा त्यांच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. दिवाळीची सुरुवात जरी चिंतेत झाली असली, तरी शेवटी मात्र त्यांनी अत्यंत आनंद साजरा केला. तसंच दागिनेही आता सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत. दरम्यान, राजस्थानच्या भीलवाडा शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली. 

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement