28 वर्षांपासून नगरसेवक, तरी हातगाडीवर विकतात पकोडे; कर्करोगही लावला पळवून!

Last Updated:

मागील 28 वर्षांपासून आळीपाळीने सतत नगरसेवक असूनही ते चक्क एका भाड्याच्या घरात राहतात. चौकातल्या एका कोपर्‍यात ते हातगाडीवर पकोडे विकतात.

+
News18

News18

अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : नेता म्हटलं की, एक साधं व्यक्तिमत्त्व समोर येतं किंवा गळ्यात जाडजूड सोन्याची चैन, बोटात 3-4 अंगठ्या, खादीचे कडक इस्त्रीचे पांढरे शुभ्र कपडे, एक मोठी चारचाकी गाडी आणि अवतीभोवती कार्यकर्त्यांचा गराडा असं व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभं राहतं. महिला कार्यकर्ती असली तरी तिचाही वेगळाच थाट पाहायला मिळतो. परंतु वर्ध्यातील एक नगरसेवक दाम्पत्य मात्र या सगळ्याला अपवाद आहेत.
advertisement
मागील 28 वर्षांपासून आळीपाळीने सतत नगरसेवक असूनही ते चक्क एका भाड्याच्या घरात राहतात. महत्त्वाचं म्हणजे हे दाम्पत्य इंगोले चौकातल्या एका कोपर्‍यात हातगाडीवर पकोडे विकतात. यावर आपला विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. विनोद आणि शिल्पा लाटकर असं या दाम्पत्याचं नाव. शिल्पा लाटकर या सध्या नगरसेवकपदी कार्यरत आहेत.
advertisement
19 वर्षांचे असताना नगरसेवक :
ही निवडणूक होती वर्धा नगरपरिषदेची, 1995 सालची. वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू होती. मालगुजारीपुरातून विनोद लाटकर यांनी लोक आग्रहास्तव वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी आपली उमेदवारी दाखल केली. ते अपक्ष उमेदवार म्हणून लढणार होते.
विनोद हे एका दवाखान्यात कम्पाउंडर म्हणून कामाला होते. त्यांचे सगळ्यांशी आपुलकीचे संबंध होते, ते सर्वांच्या मदतीला धावून जायचे. परिसरातील लोकांनीच त्यांना निवडणुकीला उभं केलं. एवढंच नाही, तर या निवडणुकीच्या खर्चासाठी चक्क वर्गणी गोळा करण्यात आली. त्यानंतर अपेक्षित असाच निकाल लागला, विनोद लाटकर एका मोठ्या पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करून भरघोस मतांनी विजयी झाले. मग त्यांनी आपल्याला मिळालेल्या पदाचं सोनं केलं. वॉर्डातली कामं होऊ लागली. नगरसेवक लाटकर लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी स्वतः परिसरात फिरू लागले आणि बघता बघता त्यांच्या वॉर्डाचा कायापालट झाला.
advertisement
विशेष म्हणजे विनोद यांनी आपली दवाखान्यातील नोकरी सुरूच ठेवली होती. त्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटला नाही. त्यांच्या याच साध्या स्वभावामुळेच त्यांना पुन्हा 2000 साली नगरसेवक बनवलं. त्यानंतर 2005 साली त्यांची नगरसेवक पदाची चक्क ‘हॅट्ट्रिक’ झाली.
advertisement
विनोद लाटकर आता दवाखान्याऐवजी एका हार्डवेअरच्या दुकानात काम करू लागले. 2010 साली त्यांचा वॉर्ड तीन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग झाला होता. मग त्यांच्या पत्नी शिल्पा लाटकर निवडणुकीला अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या. पुन्हा एकदा प्रस्थापित पक्षांच्या दिग्गज उमेदवारांना पराभूत करून प्रचंड मतांनी त्या विजयी झाल्या. ही नगरसेवक पदाची चक्क चौथी टर्म. आजही हे दाम्पत्य कुठलाही कमीपणा न बाळगता एका हातगाडीवर पकोडे विकतात.
advertisement
कर्करोगावर यशस्वी मात :
हातगाडीवर उदरनिर्वाह आणि लोकांची सेवा करत असतानाच 2021 साली विनोद यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना आपल्या शरिरात कर्करोगाची गाठ असल्याचं समजलं. उपचारासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते. तेव्हा समाजातील नागरिक आणि डॉक्टर त्यांच्या मदतीला धावून आले. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले आणि त्यांच्या शरिरातून ती गाठ काढण्यात आली. यादरम्यान 7-8 महिने त्यांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला. मात्र त्यानंतर शिल्पा लाटकर यांनी मोठ्या हिंमतीने पुन्हा पकोडे विकायला सुरुवात केली. आता दोघं मिळून कार्यालयीन कामं आणि व्यवसाय सांभाळतात. त्यांच्या कुटुंबात एकूण 7 सदस्य. विनोद लाटकर, त्यांच्या पत्नी शिल्पा लाटकर, आई, मुलगा, विधवा बहीण, तिची 2 मुलं, असं गुण्यागोविंदाने सर्वजण एकत्र राहतात.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/Politics/
28 वर्षांपासून नगरसेवक, तरी हातगाडीवर विकतात पकोडे; कर्करोगही लावला पळवून!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement