अजित पवारांचा पुणे दौरा ऐनवेळी रद्द, तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

Last Updated:

नियोजित वेळेच्या काही क्षणांपूर्वीच दौरा थांबवल्याने दोन तास संपूर्ण यंत्रणा अक्षरशः वेठीस धरली गेली

अजित पवार (उपमुख्यमंत्री)
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवडमधील नियोजित दौरा शुक्रवारी अचानक रद्द करण्यात आला. शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी आणि दर्शनाचा कार्यक्रम होता. मात्र नियोजित वेळेच्या काही क्षणांपूर्वीच दौरा थांबवल्याने दोन तास संपूर्ण यंत्रणा अक्षरशः वेठीस धरली गेली.
शहरातील अनेक प्रमुख मंडळांनी अजित पवारांच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती. लाखो रुपयांची सजावट, मंडप उभारणी, बॅनर्स-होर्डिंग्ज, तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे वातावरण गजबजले होते. मात्र, दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांनाही मोठा हिरमोड झाला. दौरा का रद्द झाला, याबाबत अधिकृत कारण समजू शकले नसले तरी सुरक्षेच्या कारणास्तव किंवा अन्य तातडीच्या कामामुळे हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
advertisement

अजित पवार मुंबईच्या दिशेने रवाना

शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल यांनी अजित पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती दिली. "अजितदादांचा दौरा काही कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून शहरातील मंडळांना भेट देण्याचा कार्यक्रम सध्या रद्द करण्यात आला आहे," असे बहल यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर

advertisement
अचानक झालेल्या या बदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. "दोन दिवसांपासून आम्ही स्वागताची तयारी केली. मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला. पण अखेर क्षणी दौरा रद्द झाल्याने हिरमोड झाला," अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींनी या दौऱ्यामुळे राजकीय शक्तीप्रदर्शनाची तयारीही केली होती, मात्र ती फसली.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील अजित पवारांचे गणेशोत्सव दौरे नेहमीच उत्साहाचे केंद्र असतात. यावर्षीचा दौरा रद्द झाल्याने शहरातील गणेश मंडळांचा उत्साह कमी झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे उपमुखमंत्री येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी शहरातील बहुतांश पोलिस देखील रस्त्यावर उभे होते मात्र नियोजित वेळे पेक्षा 2 तास उलटल्यानंतर देखील दादा आले नाही या मागचे कारण जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांना विचारणा केली असता त्यानी दादांचा दौरा रद्द झाल्याचे सांगत अजित पवार मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती दिली.
advertisement
दादांच्या स्वागतासाठी सकाळपासून ताटकळत थांबलेले समर्थक आणि नागरिकांचा हिरमोड झाला तर यंत्रणा देखील वेठीस धरल्या गेली. विशेष म्हणजे ips अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी संभाषनमुळे अडचणीत आल्याने देखील माध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठी देखील अजित पवार यांनी आपला दौरा रद्द केल्याची चर्चा रंगली होती
मराठी बातम्या/पुणे/
अजित पवारांचा पुणे दौरा ऐनवेळी रद्द, तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement