advertisement

Ajit Pawar Accident : आगीचा भडका अन् सगळं संपलं! अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? CCTV Video समोर

Last Updated:

Ajit Pawar Death Accident CCTV Video : जित पवार यांच्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. बारामतीत आज सकाळी धावपट्टीवर उतरत असताना विमान क्रॅश झालं. मोठी आग लागली.

Ajit Pawar Death Accident CCTV Video
Ajit Pawar Death Accident CCTV Video
Ajit Pawar Accident CCTV Video : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी (28 जानेवारी) बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादा प्रचारासाठी बारामतीला जात होते. अशातच आता अजित पवार यांच्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

पाहा Video

महाराष्ट्र पंचायत निवडणुकीसाठीच्या चार सभांना उपस्थित राहण्यासाठी अजित पवार बारामतीला जात होते. अपघाताची माहिती मिळताच पवारांचे कुटुंबीय त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावरुन रवाना झाले आहेत. बारामतीमध्ये मोठा जनसमुदाय लोटला असून पोलिसांना परिस्थिती हाताळण्यास घाम फुटत आहे.
अपघातापूर्वी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना झाला होता. विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचं राणाजगजीतसिंह यांच्यासोबत बोलणं झालं होतं. मी नंतर फोन करतो म्हणत अजित पवार यांनी नंतर फोन करण्याचं आश्वसन दिलं होतं. त्यानंतर बारामतीत उतरल्यावर पुढील बोलणं होणार होतं पण त्याआधीच अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Accident : आगीचा भडका अन् सगळं संपलं! अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? CCTV Video समोर
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement