Maharashtra politics : लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच धंगेकर अडचणीत; पुण्यातून मोठी बातमी समोर

Last Updated:

महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे, पुण्यामधून काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.

News18
News18
पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी : काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभेच्या काही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. पुण्यामधून काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुणे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर आलं आहे. काँग्रेसचे नेते आणि सात टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल यांचं व्हॉटस अप स्टेटस समोर आलं आहे. 'पुण्यात निष्ठेची हत्या ' म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आबा बागुल हे देखील पुण्यातून काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र रवींद्र धंगेकर यांना तिकीट मिळाल्यानं आबा बागूल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
पुण्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तर दुसरीकडे या मतदारसंघातून भाजपच्या वतीनं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मोहोळ विरोधात धंगेकर असा सामान रंगणार आहे. मात्र दुसरीकडे धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Maharashtra politics : लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच धंगेकर अडचणीत; पुण्यातून मोठी बातमी समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement